सोमवार, ३० ऑक्टोबर, २०१७

अपशकुनातले विज्ञान


आज सक्काळी-सक्काळी बायको बरोबर चहा पिताना
एक अभद्र व्यक्ती दृष्टीस पडली

मी बायकोला म्हटले,
"आजचा दिवस वाईट जाणार".

मग बायकोने समजुतीच्या सुरात विचारले,
"तू अशा गोष्टी कधीपासून मानायला लागलास?"

खरं तर यात मानण्या न मानण्य़ाचा भाग नसून
पचायला जड जाईल असे विज्ञान आहे.

माणसांची व्यक्तीमत्त्वे आपल्या मनावर खोलवर परिणाम करतात.
अशी माणसे समोरून आली की आपण त्यांना टाळतो.
काही माणसांची तोंडे दिसली की Amygdala सक्रिय होते,
मग  Autonomous nervous system ची
sympathetic branch उद्दीपित होते आणि
मेंदूचा कल (bias) नकारात्मकतेकडे झुकतो.
आणि मग दिवस खराब जायला पार्श्वभूमी तयार होते.
हे सर्व काही क्षणात आपोआप घडत
असल्याने आपण बेसावध असताना नियंत्रण राहीलच असे नाही.
 या उलट काही माणसे दिसली की आपल्याला शांत किंवा प्रसन्न वाटते आणि आनंद होतो.
हे parasympathetic nervous system सक्रिय झाल्याने घडते.
काही दिवसांपूर्वी बघितलेल्या एका TED Talk
मध्ये याचे खुलासेवार विवे़चन बघायला मिळाले.

अपशकुनातले विज्ञान हे असे आहे. अनिस हे विज्ञान लोकांना समजावून सांगेल अशी अपेक्षा नाही...