मंगळवार, २९ जुलै, २००८

एक ऑगस्टचे सूर्यग्रहण

येत्या १ ऑगस्ट रोजी सायन सिंह राशीमध्ये सूर्यगहण होत असून ते फलिताच्यादृष्टीने मिश्र फळे देईल. ग्रहणाची अमावस्या ९अंश ३५ कलांवर पडत असून या बिंदूशी मंगळ आणी प्लुटॊचा मध्यबिंदू अंशात्मक केंदयोग करत असल्याने ग्रहणाची अमावस्या ग्रहणाची अमावस्या स्फोटक बनली आहे. एवढेच नव्हे तर सायन सिंहरास ८अंश ते ११ अंश हे क्षेत्र फलीताच्या दृष्टीने महत्त्वाचे बनले आहे. याबरोबरच सायन कुंभ, वृषभ, आणी वृ्श्चिक या राशीतील ८अंश ते ११ अंश हे क्षेत्र ग्रहणाच्या अशुभ प्रभावाखाली येतात. पण हे ग्रहण पूर्णत: अशुभ मानता येत नाही कारण अमावस्येने सायन धनु व मे्ष या दोन राशीमध्ये ८अंश ते ११ अंश हे क्षेत्र शुभ केले आहे.ज्यां व्यक्तींचे जन्म खालील जन्म तारखांच्या सान्निध्यात झालेले असतील त्यांच्या पत्रिकेमध्ये शनि, युरेनस (हर्षल), नेपचून व प्लुटॊ हे ग्रह येत्या सूर्यग्रहणाने बाधित होतात.


हे ग्रहण कुणाला अशुभ?

खालील तारखांच्या मागे व पुढे ३ आठवडे ज्यांचे जन्म आहेत त्यांच्या पत्रिकेत शनि ग्रहणाने बाधित होतो. या कालावधीमध्ये शनीचे इतर ग्रहांशी युती, प्रतियुती, केन्द्र, अर्धकेन्द्र इत्यादि योग होत असल्यास ग्रहण जास्त त्रासदायक असेल.

6 Jun 1940

26 Nov 1940

22 Feb 1941

14 Jul 1947

15 Oct 1954

4 Apr 1962

10 Jul 1962

28 Dec 1962

13 Apr 1970

22 Aug 1976

20 Nov 1983

खालील तारखांच्या मागे व पुढे १ महिना ज्यांचे जन्म आहेत त्यांच्या पत्रिकेत युरेनस बाधित होतो. या कालावधीमध्ये युरेनसचे इतर ग्रहांशी युती, प्रतियुती, केन्द्र, अर्धकेन्द्र इत्यादि योग होत असल्यास ग्रहण जास्त त्रासदायक असेल.

7 Sep 1957

31 Jan 1958

25 Jun 1958

4 Dec 1976

4 May 1977

22 Sep 1977


खालील तारखांच्या मागे व पुढे २ महिने ज्यांचे जन्म आहेत त्यांच्या पत्रिकेत नेपचून बाधित होतो. या कालावधीमध्ये नेपचूनचे इतर ग्रहांशी युती, प्रतियुती, केन्द्र, अर्धकेन्द्र इत्यादि योग होत असल्यास ग्रहण जास्त त्रासदायक असेल.


20 Nov 1960

14 May 1961

23 Sep 1961


खालील तारखांच्या मागे व पुढे २ महिने ज्यांचे जन्म आहेत त्यांच्या पत्रिकेत प्लुटो बाधित होतो. या कालावधीमध्ये नेपचूनचे इतर ग्रहांशी युती, प्रतियुती, केन्द्र, अर्धकेन्द्र इत्यादि योग होत असल्यास ग्रहण जास्त त्रासदायक असेल.


15 Sep 1944

8 Jan 1945

24 Jul 1945

27 Mar 1946

18 May 1946

6 Jan 1987

21 Mar 1987

26 Oct 1987


हे ग्रहण कुणाला शुभ?


वर म्हटल्याप्रमाणे या अमावस्येने सायन धनु व मे्ष या दोन राशीमध्ये ८अंश ते ११ अंश हे क्षेत्र शुभ केले आहे. या ठिकाणी कोणतेही ग्रह असून ते इतर ग्रहांशी लाभ अथवा नवपंचम योग करत असतील तर त्या व्यक्तींच्या आयुष्यात अडचणी अथवा समस्या असतील तर त्या सुटतील किंवा अन्य स्थैर्य आणणा-या घटना घडतील.

सोमवार, १६ जून, २००८

वृद्धांच्या समस्येवर जालीम उपाय

संपाद्क
दैनिक सकाळ

आजच्या सकाळ मधिल वृद्धांच्या समस्येवरील वृत्त वाचून त्यातील भीषणतेची कल्पना आली. आपल्याला कल्पना नसेल म्हणून सांगतॊ पुण्यातील कुटुम्ब न्यायालयात प्रॅक्टीस करणारे काही वकील एकाकी वृद्धाना मरण लवकरात लवकर प्राप्त व्हावे म्हणून काही अभिनव उपक्रम राबवतात.

आज काल जरा काही खुट्ट झाले तरी मुक्त स्त्री छ्ळ कायद्याचा आधार घेउन कोर्टाचे दरवाजे ठोठावते आणी "छ्ळ छ्ळ" म्हणून ऊर बडवते. अशा स्त्रीला ती कितीही खोटे बोलली तरी कायद्याचे पूर्ण संरक्षण असते. अशा मुक्त स्त्रीचा छ्ळ होण्यास काहीही कारणे चालू शकतात. घरातील एखाद्या वृद्धव्यक्तीला चहाचा कप द्यावा लागला तरी मुक्त स्त्रीचा छ्ळ होतो.

सकाळ सारखी नपुंसक वृत्तपत्रे डोळ्यावर कातडे ओढून बसली असल्यामुळे कुटुम्ब न्यायालयात बहूतांश दाव्यामध्ये काय चालते हे त्यांना कधिच कळणार नाही.

अशावेळेला अशा अडचण ठरलेल्या वृद्धांना खड्यासारखे बाजूला करण्या साठी छ्ळ कायदा, ४९८-अ इ. कायदे कामी येतात. अशा कायद्यांमध्ये मुक्त स्त्रीवर कॊणतीही गोष्ट सिद्ध करण्याची जबाबदारी नाही. तर आपण निष्पाप आहोत हे पुरूषाला सिद्ध करावे लागते. त्यामूळे सासू-सासरे वगैरे मंडळीना छ्ळाच्या कायद्याखाली गोवले की ते हाय खाऊन मरतात. आणी त्यांनी हाय खाल्ली हे कुठेही सिद्ध होत नाही. तसेच न्यायालये पण खॊट्या दाव्यामुळे पुरुषाचे नुकसान होते हे मान्य करत नाही, हे या कायद्याचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. (चुकून न्यायालयानी हे मान्य केले तर खोट्या दाव्यांचा भार कमी झाल्यामूळे कित्येक वकील भिकेला लागतील). ज्या वृद्ध मंड्ळीकडे थोडीफार मालमत्ता आहे अशांना या कायद्याचा आधार घेऊन सावज बनवता येते.

तर कायद्याच्या या अंगाची जास्तीत जास्त मुक्त स्त्रीयांना माहीती व्हावी या साठी सकाळने पुढाकार घेऊन विद्या बाळांसारख्या विदूषींच्या नेतृत्त्वाखाली कार्यशाळा आयोजित कराव्यात. पुण्याच्या कुटुम्ब न्यायालयात प्रॅक्टीस करणारे काही वकील यासाठी आपल्याला मार्गदर्शन करतीलच.

हा उपक्रम आपण लवकरात लवकर हातात घ्यावा ही विनंती.

कळावे
आपला


राजीव उपाध्ये

शुक्रवार, १३ जून, २००८

सावधान! येत्या १० जुलैची शनी-मंगळ युति


सावधान! येत्या १० जुलैची शनी-मंगळ युति


येत्या दहा जुलै रोजी सायन कन्या राशीत पाच अंशावर शनी मंगळ युति होत आहे। शनी-मंगळ युती आधुनिक ज्योतिषात वैफल्य आणी अडथळे इत्यादींची दर्शक मानतात.

ज्यांच्या पत्रिकेत सायन कन्या, धनू, मीन, मिथुन राशीत ४ ते ६ अंशात कोणतेही ग्रह असतील आणी जर हे ग्रह लग्न रवि, चंद्र, दशमभाव आरंभ-बिंदू यांच्याशी युति, प्रतियुति, केन्द्र, अर्धकेन्द्र योग करत असतील तर या युतीची त्रासदायक फळे अनुभवायला येउ शकतात.

दहा जुलै रोजी रवि-चंन्द्राचा मध्यबिंदू दूपारी ३-४९ वाजता शनी-मंगळाबरोबर युती योग करतॊ. त्यामुळे या युतिचा सर्वात जास्त प्रभाव लाहोर, इस्लामाबाद आणि पश्चिम भारताचा काही भाग यावर पडतॊ. यामुळे ही युती या भागातून काही अशुभ घटना घड्वून आणायची शक्यता आहे। शनि-मंगळ युतीचे प्रभावक्षेत्र वरील नकाशात रंगीत पट्टीने दाखवले आहे।

काही मागील आणि पुढिल शनि-मंगळ युतीच्या तारखा
23 Feb 1988 AD 6:30:45 pm
1 Mar 1990 AD 4:42:48 am
6 Mar 1992 AD 11:21:30 pm
14 Mar 1994 AD 10:30:41 am
22 Mar 1996 AD 7:16:21 am
2 Apr 1998 AD 12:59:28 pm
16 Apr 2000 AD 1:57:43 am
4 May 2002 AD 11:26:13 am
25 May 2004 AD 11:07:38 am
18 Jun 2006 AD 11:32:06 am
10 Jul 2008 AD 11:42:38 pm
31 Jul 2010 AD 1:35:20 pm
15 Aug 2012 AD 4:04:18 pm
26 Aug 2014 AD 1:02:39 am
24 Aug 2016 AD 4:52:02 pm
2 Apr 2018 AD 9:10:49 pm
31 Mar 2020 AD 11:58:36 pm
5 Apr 2022 AD 7:20:17 am
11 Apr 2024 AD 2:04:29 am
20 Apr 2026 AD 4:12:16 am
1 May 2028 AD 4:09:11 am

शुक्रवार, २३ मे, २००८

<< Testing Astrology>>> संपादक दैनिक सकाळ

संपादक

दैनिक सकाळ, पुणे

स.न.वि.वि.


अंधश्रद्धा निर्मूलन समितीने ज्योतिषांना केलेल्या आवाहनातील भंपकपणा उघड
झाल्याला आता आठवडा होईल. वास्तविक हा भंपकपणा समितीने आयोजित केलेल्या पत्रकार
परिषदेतच उघड व्हायला हवा होता. दू:ख या गोष्टीचे वाटते, की वृत्तपत्रांना
अंधश्रद्धा निर्मूलन समितीला समज देण्याची कोणतीही गरज वाटली नाही.


माझ्या personal library मध्ये दिलीप साळवी या लेखकाचे Nonsense in Indian
Science हे पुस्तक आहे. या पुस्तकात भारतातील वैज्ञानिक जगतातील भोंगळपणा अतिशय
परिणामकारकपणे जगापुढे आणला आहे. जागतिक पातळीवर एखाद्या विज्ञाननिष्ठाचे अपयश
जेवढे मोठे किंवा नेहरू आणि गांधी घराण्याशी जवळीक जेवढी जास्त तेवढा तो
वैज्ञानिक भारतात मोठा असतो...


हे नमूद करण्याचे कारण असे की अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आता अशा अपयशी
वैज्ञानिकांचे शेपूट धरून विज्ञाननिष्ठेचे ढोल बडवण्यापेक्षा भारतीय वैज्ञानिक
जगताचे शुद्धीकरणाची मोहिम हातात घेऊन फत्ते करून दाखवावी. किमानपक्षी,
इतरांच्या चाचण्याघेण्या अगोदर आपल्यावर नामुष्कीची वेळ येणार नाही याची काळजी
घ्यावी.


कळावे


राजीव उपाध्ये

---------------------------
www.yuyutsu.biz
http://rajeev-upadhye.blogspot.com/
--------------------------

शुक्रवार, १६ मे, २००८

नारळीकराना पत्र

Tuesday, May 13, 2008

Prof. Jayant Narlikar et al

IUCAA

Pune University Campus

Pune 411007




Dear Prof. Narlikar




I read in today's sakal (dated May 13, 2007) that you have taken interest in
developing a test for testing astrology based on statistics.

I am very much excited and willing to participate in this testing for I am a
strong supporter of astrology.

However, I am willing to make my contribution to your project subject to the
following conditions:

o I will communicate with your team only in writing (fax/email) and I expect
the same from you. If I find it necessary I will publish this communication
on a suitable platform.

o I belong to a modern school of astrologers who have different set of
beliefs/axioms than majority of astrological community in India and
therefore it is important that I get all the necessary information (which I
normally use in my practice) needed to make contribution solicited by your
team in this testing.

Here I briefly clarify the same -

Astrological rules are like linguistic rules - they evolve with time.
Therefore to make any kind of prediction it is important to find out what
planetary patterns are existing in given time period. Based on these
patterns found in fresh data one can go on making predictions about the test
data (supplied by you in this case).

External factors are influential in making choices- The immediate external
factors are stress levels of parents and other relevant factors. Therefore
it is extremely important to have a look at parent's horoscopes before and
at the time of child births.

I therefore request you to supply me the fresh data spanning over (period of
10-20 years) which I will use for finding patterns and then for making
predictions.

I need sample of adequate size, say 2000 or more birth charts of bright and
retarded children each along with their parents birth data.

I will need assistance from your team for all the data entry work and all
other related stages (except the one of making predictions) required for
this project for the software tools I will be using.

I also need clear DEFINITIONS of attributes/traits you are going to test.

I am sure you will find my requirements just and will be happy to satisfy
them. Looking forward eagerly to hear from you soon.


Thanking You,

Sincerely

(Rajeev Upadhye)

CC: Sakal, Pune

Deaprtment of Statistics, University of Pune

Internet groups/blogs etc

बुधवार, १९ मार्च, २००८

<< संपादक, दैनिक सकाळ, पुणे यांस >>

संपादक, दैनिक सकाळ, पुणे यांस,

स. न. वि. वि.

आजच्याच सकाळमध्ये प्रसिद्ध झालेली असोचेमच्या अहवालाविषयीची बातमी वाचली.
आरक्षणाचा फायदा न मिळाल्यामुळे, माझ्या अविकसित राहिलेल्या बुद्धीच्या मदतीने
कल्पनाशक्तीला ताण देउन, बातमीतील वास्तव व कल्पना हे दोन्ही समजाऊन घ्यायचा
प्रयत्न मी प्रामाणिक प्रयत्न केला.

अशी कल्पना करूया, की खरोखरच ह्या ५३ हजार कोटी मधील काही पैसा
कर्मधर्मसंयोगाने देशात राहीला आणि तर काय काय होउ शकते? याचे उत्तर 'अनेक
फायदे' असे देता येईल. यातला महत्त्वाचा फायदा म्हणजे राजकीय नेते आणि नोकरशाही
यातील भूकबळींची संख्या नक्कीच कमी होईल.

उरलेल्या पैशातून ज्या आयायटी उभ्या राहतील त्या सर्वच्या सर्व आरक्षित म्हणून
घोषित कराव्यात (आरक्षित मतदार संघाच्या धर्तीवर). आरक्षणापासून वंचित
असलेल्याना या आरक्षित आयायटीमध्ये प्रवेशपण निषिद्ध असावा. सोन्याच्या
खाणीमध्ये मध्ये जसे कित्येक टन खनिजाची प्रक्रिया करून काही ग्रॅम शुद्ध सोने
मिळते तसेच या आरक्षित खाणींमध्ये नक्कीच सोने सापडेल.

परंतु, यात एक महत्त्वाची समस्या आहे ती अशी की, हे ५३ हजार कोटी ज्यांच्या
कडून देशाबाहेर जातात त्यांना दादापुता अथवा धाकदपटशा करून देशातच रोखून ठेवणे
आवश्यक आहे. हे कसे जमवायचे? या समस्येचे लवकरात लवकर योग्य असे समाधान या
देशातील आरक्षित बुद्धीमत्तेने लवकरात शोधून काढावे, ही माझी कळकळीची विनंती.

कळावे

आपला

राजीव उपाध्ये

---------------------------
www.yuyutsu.biz
http://rajeev-upadhye.blogspot.com/
--------------------------

शुक्रवार, ८ फेब्रुवारी, २००८

ऐशी तैशी - स्त्रीमुक्तीची आणि मातृत्वाची

माझ्या परिचयाच्या एका वकीलीण बाईंशी एकदा सहज गप्पा मारता मारता ऐकायला
मिळालेली एका मुक्त आणि कर्तबगार मुलीची ही रंजक कथा...

ही मुक्त स्त्री अतिशय हूषार आणि त्यामुळे उच्चविद्याविभूषित होती. साहजिकच या
सर्वाला साजेल अशी गलेलठ्ठ पगाराची नोकरी पण तीला होती. याच नोकरीत यथावकाश
तिच्याच एका सहका‌र्‍याशी झालेल्या ओळखीचे रुपांतर प्रेमात होऊन त्यांचे लग्न
ठरले आणि थाटामाटात पार पडले.

त्या दोघांचा झक्क असा राजाराणीचा संसार सुरू झाला. रोज सकाळी दोघे एकत्र बाहेर
पडत, सकाळचे जेवण दोघे ‍ऑफिसातच घेत. संध्याकाळी कामाच्या रगाड्यानुसार वेळी
अवेळी फ्लॅटवर केवळ झोपण्यासाठी परत येत.

यात मोठा चमत्काराचा भाग असा की थोड्याच दिवसानी या राजाराणीला बाळाच्या
आगमनाची चाहूल लागली आणि बाळाचे आगमन झाले तेव्हा मात्र आपल्या मुक्त आणि
कर्तबगार नायिकेच्या घोड्दौडीला अचानक लगाम बसला. बाळ थोडे मोठे झाले तसे
त्याच्या आईला मात्र स्वस्थ बसवेना. Customer Satisfaction चा घोष आणि
डेडलाईनला लोंबकळणारी बढतीची गाजरं राजाराणीला खुणावू लागली. जीवाची घालमेल
जेव्हा फारच वाढली तेव्हा मात्र त्या मातापित्यानी आपल्या सहा महिन्याच्या
बाळाला पाळणा घरात ठेवायचा नि‍र्णय घेतला. खुप आटापिटा करून एक मनासारखे पण
घरापासून थोडे दूर पाळणाघर त्यांना मिळाले. सकाळी पाच-साडेपाच वाजता बाहेर पडून
बाळाला पाळणाघरात सोडायचे, मग जिम करून ऑफिसात जायचे आणि येताना नउ वाजता
बाळाला घ्यायला जायचे असा नेम चालू झाला.

पण हे चक्र फार दिवस टिकणार नव्हते... बाळ थोडे मोठे झाले आणी एक विचित्र
समस्या निर्माण झाली.

दिवसभर पाळणाघरात राहिल्यामुळे फक्त रात्री आपल्याला घेऊन जाणारे राजाराणी आपले
कॊण हे काही त्याला कळेना. ते आपल्याला घरी नेतात आणि मग एसी लावून लगेच झोपून
का जातात हे त्याला कळेना. बाळ थोडे आणखी मोठे झाले तेव्हा मात्र त्याने
थयथयाट करून या प्रकाराचा निषेध नोंदवायला सुरूवात केली. आता मात्र राजाराणीला
कळले की कुठेतरी काहीतरी चुकतय. मात्र प्रश्न गंभीर होऊ लागल्यावर छातीवर दगड
ठेवून त्या कर्तबगार माउलीने नोकरीचा राजीनामा दिला.

Customer satisfaction ची दमदार आह्वाने झेलणारी ही मुक्त आणि कर्तबगार
स्त्री पॊटच्या गोळ्याचे संगोपन करतांना ठेचकाळू लागली, चिडचिडू लागली. सहन
होईना तेव्हा बाळाचा आणि मातृत्वाचा तिरस्कार करू लागली... आणि मग ... ही गोष्ट इथेच संपली.

रविवार, ३ फेब्रुवारी, २००८

<<< एक कोडे >>>

एक कोडे

आधुनिक मानवाच्या काही श्रद्धा मला नेहेमी कोड्यात टाकतात. याचे मला कधी हसू
येते तर कधी त्यांची कीव करावीशी वाटते. उदाहरणच सांगायचे झाले तर मानवाची इतर
प्राणी जगतापासून स्वत:ला वेगळे ठेवण्याची धडपड... आधुनिक मनुष्यप्राणी स्वत:ला
इतर प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ समजतो. या श्रेष्ठत्वाचे तो अनेक त‍र्हांनी समर्थन
करतो. हे श्रेष्ठत्व टिकवण्यासाठी अनेक भल्याबु‍र्‍या मार्गांचा अवलंब आजवर
त्याने केला आहे. माणसाचा 'विकास' पावलेला मेंदू हा या समर्थनाचा मुख्य आधार
आहे.

या विकास पावलेल्या मेंदूने प्रश्न सोडवले किती आणि निर्माण केले किती? असा जर
शोध घ्यायचा प्रयत्न केला तर प्रामाणिकपणे उत्तरे देणे अनेकांना कठीण जाईल.
उदाहरण जर घ्यायचे झाले तर धार्मिक तेढीचे घेता येईल. माणसाचा विकास पावलेला
मेंदू युद्ध, दहशतवाद, मूलतत्त्ववाद हे प्रश्न अजिबात हाताळू शकत नाही. आज
कुणालाही दुर्धर आजारांनी ग्रासलेले असले तर आधुनिक वैद्यकीय उपचार उपलब्ध
आहेत. पण ते वेळेवर मिळतील कि नाही याची खात्री देता येत नाही. आणि जर ते
मिळालेच तर ते उपचारच जीवावर उठतील का हे पण सांगता येणार नाही. मुंबईच्या
लोकल्सना बॉंब स्फ़ोटापासून कुणीही वाचवू शकत नाही किंवा एखाद्या विमानाचे अपहरण
होईल का हे पण कुणाला सांगता येणार नाही.

थोड्क्यात सांगायचे झाले तर आजवर सतावणा‍र्‍या प्रश्नांची जुजबी आणि तात्पुरती
उत्तरे सापडली की माणसाचा विकास पावलेला मेंदू सुखावतो. हे प्रश्न ज्यांना कधिच
सतावणार नाहीत अशा अलिप्तपणे जगणार्‍या मनुष्येतर प्राण्यांना मात्र तॊ हीन
लेखतो. कारण मला वाटत की माणसाचं मनुष्यत्त्व प्रश्न निर्माण करण्यात अडकलं
आहे. आता हेच बघा ना, मनुष्येतर प्राण्यांचे मूळ प्रश्न - आहार निद्रा मैथुन -
हे त्यांच्या मेंदूचा विकास न पावल्याने सीमित राहिले आहेत.


आता मला हे सांगा आपल्या अस्तित्वाचे प्रश्न सीमित असणं हे लक्षण श्रेष्ठपणाचे
की भ्रष्टपणाचे? विकासाचे की अधोगतीचे? या प्रश्नाचे उत्तर ठाउक असून दिले
नाहीत तर तुमच्या डोक्याची शंभर शकले होऊन ती तुमच्याच पायाशी लोळू लागतील...

राजीव उपाध्ये
-------------------------
http://rajeev-upadhye.blogspot.com/
www.yuyutsu.biz
-------------------------

शनिवार, २ फेब्रुवारी, २००८

<< श्री. अच्युत गोडबोले यांस>>

श्री. अच्युत गोडबोले यांस,
स. न. वि. वि.

आपले दि. २३ डिसेंबर २००७ च्या लोकसत्तेमध्ये प्रसिद्ध झालेले 'वेगळे एन आर आय'
या शीर्षकाखालील लिखाण वाचले
(http://www.loksatta.com/daily/20071223/lr01.htm). तुमच्या (आणि
तुमच्याविषयीच्या) बर्‍याच लिखाणातून तुम्ही वारंवार, एसेस्सी बोर्डापासून ते
युनिव्हर्सिटी आणि आयायटी पर्यंत अनेक रॅन्क्स आणि पदकं मिळवून अमेरीकेत
स्थायिक न झाल्याचा उल्लेख येतो. याशिवाय आपण कितीवेळा परदेश प्रवास केलात याचा
पण उल्लेख बर्‍याच वेळा येतो. ९४-९५ च्या सुमारास वाचलेल्या एका लेखात आपला
परिचय '५२ वेळा परदेशप्रवास केलेले' असा होता. २३ डिसेंबर २००७ च्या लेखात
तुमचा परदेशप्रवास १००-१५० वेळा झाला असल्याचा उल्लेख आहे.

या गोष्टीचा मुद्दाम निर्देश करण्याचे कारण असे अमुक अमुक इतक्या वेळा
परदेशप्रवास करणारे, एसेस्सी बोर्डापासून ते युनिव्हर्सिटी आणि आयायटी पर्यंत
अनेक रॅन्क्स आणि पदकं मिळवून अमेरीकेत स्थायिक न होणारे श्री. अच्युत गोडबोले
असा उल्लेख मनात फक्त आता किळस निर्माण करतो. वास्तविक आयायटी मध्येच असे
असंख्य ईश्वराचे लाडके पुत्र दरवर्षी निर्माण होतात. पण कुणीही आपण केलेल्या
परदेशवार्‍यांची अशी स्वत:च जाहिरात
केल्याचे ठाऊक नाही. मी ज्यांच्याकडे ध्रुपद गायकीची ओळख करून घेतली त्या
श्री. उदय भवाळकरांनी परदेशात अनेकवेळा सवाइगंधर्वमहोत्सवापेक्षा झगमटात
अनेकपट मोठ्या आणि आळंदीला मानवीविष्ठेच्या घमघमाटात वारकर्‍यांसारख्या
अडाणी, अशा दोन टोकांच्या श्रोतृवर्गापुढे, तितक्याच तल्लिन्तेने गायन केले
आहे. पण ते कधिही याचा बडेजाव मिरवताना पाहिले नाही.

अशी अनेक उदाहरणे या ठिकाणी देता येतील. या गोष्टीची आपण गंभीर दखल घ्यावी ही
विनंति...

आपला

राजीव उपाध्ये

शुक्रवार, १ फेब्रुवारी, २००८

सूर्य ग्रहण - दिनांक ७ फेब्रुवारी २००८


सूर्य ग्रहण - दिनांक ७ फेब्रुवारी २००८

दिनांक ७ फेब्रुवारी रोजी २००८ या वर्षातील १ले सूर्य ग्रहण असून ते सायन कुंभ राशिमध्ये होत असून ते १७-४० अंशावर होत आहे. निरयन राशिचक्राप्रमाणे ते २२-५० अंशावर मकर राशिमध्ये पडत आहे. हे ग्रहण फक्त दक्षिण गोलार्धात दिसणार असून सोबतच्या आकृतीमध्ये ग्रहणाचा मार्ग दाखविला आहे.

भारतीय समाजात अमावस्या आणि पौर्णिमा या खगोलशास्त्रीय घटनांना असाधारण मह्त्त्व आहे। अमावस्या ही काळोखी असल्यामुळे अशुभ आणि पौर्णिमा ही शुभ्र चंद्रप्रकाशामुळे शुभ अशी एक भाबडी समजुत आपल्या सर्वांच्या मनात घर करून असते। पण शुभ आणि अशुभाच्या कल्पना संस्कृतीजन्य असतात। वास्तविक अमावस्येला चंद्र भ्रमणाचे एक आवर्तन संपून दूसरे चालू होते। पौर्णिमेला या आवर्तनाचा परमोच्च बिन्दु येतो - कारण चंद्र,पृथ्वी आणि रवि एकमेकांशी १८० अंशाचा कोन म्हणजेच प्रतियुती करतात. म्हणजेच अमावस्या एक नवी सुरुवात असते. केवळ निशाचरांना प्रिय म्हणून अमावस्या वाईट मानणार्‍यांनी हे लक्षात घ्यावे की रात्रीच्या काळोखात सृष्टीतील बहुसंख्य जीवांचे सर्जनाचे, श्रमपरिहाराचे कार्य चालते. त्याकडे दूर्लक्ष करून केवळ प्रकाशाला मानवी मनात अतिशय मह्त्त्व असल्याने प्रतिपदा हा आरंभबिंदू आणि म्हणुन ती शुभ मानणे माझ्यामते हा शुद्ध मूर्खपणा आहे.

हे सर्व लिहिण्याचे कारण असे की आधुनिक ज्योतिषात सर्व अमावस्या अशुभ नसतात आणि सर्व पौर्णिमा शुभ नसतात. असो.

या ग्रहणाची कुंडली मांडली असता हे ग्रहण गोचर नेपच्युनशी जोरदार युती करत आहे. याशिवाय हे ग्रहण गोचर मंगळाशी नवपंचम योग करत असून मंगळाचे प्लुटॊ आणि हर्षल या दोन ग्रहांबरोबर प्रतियुति आणि केन्द्र योग करत आहे. हे सर्व योग फलिताच्या दृष्टीने महत्त्वाचे असून सर्वसाधारणपणे आयुष्यात मोठी स्थित्यंतरे दाखवतात. सायन कुंभ, सिंह, वृषभ या राशीमध्ये ज्यांच्या पत्रिकेत १५ ते १८ अंशात लग्न, दशमभाव आरंभबिंदू, चंद्र व रवि आणि या ग्रहांचे शनी, हर्षल, नेपच्यून, प्लुटो या ग्रहांशी अंशात्मक युती, प्रतियुती, केंद्र, अर्धकेंद्र योग होत असतील अशा व्यक्तीना या ग्रहणाची त्रासदायक फळे अनुभवास येउ शकतात. लग्न, दशमभाव आरंभबिंदू, चंद्र व रवि यांनी केलेल्या योगांच्या प्रतीनुसार हे अनुभव कमी जास्त प्रमाणात येतात.

या ग्रहणात ठळकपणे गुंफले गेलेले मंगळ, हर्षल आणि प्लुटॊ हे ग्रह उर्जेच्या विविध रुपांचे प्रतिक आहेत. तर नेपच्यून हा ग्रह कमकुवतपणा आणणारा आणि वास्तवाचे भान सोडायला लावणारा ग्रह आहे. या गोचर ग्रहांचे कुंडलीतील ग्रहांशी होणारे योग - विशेषत: युती, प्रतियुती आणि केंद्र, नवपंचम - फलिताच्या दृष्टीने महत्त्वाचे असतात.

पण ही अमावस्या पूर्णपणे अशुभ आहे का? या प्रश्नाचे उत्तर नाही असे आहे ज्यांच्या पत्रिकेमध्ये १५ ते १८ अंशात लग्न, दशमभाव आरंभबिंदू, चंद्र, रवि, बुध, शुक्र, गुरु हे ग्रह सायन कुंभ, मिथुन आणि तूळ राशीत असून नवपंचम अथवा लाभयोग करत असतील तर हे ग्रहण शुभ ठरण्याची शक्यता आहे.