सोमवार, ३१ जानेवारी, २०११

आयुष्यातील उत्कर्ष आणि मध्यबिंदू ज्योतिष

भारतीय ज्योतिषात योग ही एक गुंतागुंतीची कल्पना आहे. त्यात राजयोगाला विशेष स्थान आहे. राजयोगाची फले अनेक असू शकतात पण सहसा एका सामाजिक स्तरातून दूसर्‍या वरच्या सामाजिक स्तरात जाणा-या प्रयत्नवादी, धडपडणा-या व्यक्तींच्या पत्रिकेत राजयोग किंवा इतर शुभ योग कार्यरत असल्याचे मानाले जाते. पण इथे एक गोची आहे, ती अशी की भारतीय ज्योतिषात शुभ योग सतराशे साठ आहेत, शिवाय ते बाबा आदम च्या काळातले आहेत. राजयोगाना निष्फ़ल करणारे योग सतराशे साठ गुणिले दोन (कदाचित जास्तच) आहेत. त्यामुळे भारतीय ज्योतिष वस्तुनिष्टपणे अभ्यासणा-यांची भंबेरी उडते.

पाश्चात्य जोतिषात इतकी गुंतागुंत दिसून येत नाही. एक नियम आणि त्याला भरमसाठ अपवाद असा प्रकार त्यात नाही. उत्कर्ष आणि अपकर्ष सांगणारे नियम तूलनेने कमी. त्यामूळे एक प्रकारचा सुटसुटीतपणा आधुनिक पाश्चात्य ज्योतिषात आहे. याला अपवाद फक्त प्राचीन पाश्चात्य ज्योतिषाचा. तिथे भारतीय ज्योतिषासारखाच अंदाधुंद कारभार आहे. पण तरीही भारतीय ज्योतिष गोंधळाच्या बाबतीत एकमेवाद्वितीय आहे (पुण्या-मुंबईकडचे बरेच ज्योतिषी मात्र याला अपवाद आहेत).

मध्यबिंदू ज्योतिषात आधारभूत कल्पना सुटसुटित असल्याने नियमांची उतरंड हाताळायला जास्त सोपी. उत्कर्ष मध्यबिंदू ज्योतिषात कसा बघायचा हे एकदा मी माझी अमेरीकन गुरु मॅरी डाऊनिंग हिला विचारला होता. तिने मला उत्तर दिले पण त्या अगोदर लांबलचक इमेल लिहून उत्कर्ष कसा बघायचा नाही हे सांगितले. त्यातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्वसाधारणपणे उत्कर्ष झालेल्या व्यक्तींच्या कुंडल्या अभ्यासून नियम बनवले जातात. केवळ तसे न करता उत्कर्ष साधण्यासाठी अनेक पूरक घटकांची आवश्यकता असते. संधी (रवी-गुरु), स्वयं-तेज (रवी-मंगळ किंवा रवी प्लुटो) इत्यादि... पत्रिकेतील मंगळाचा (धडपड, प्रयत्न) आणि शनीचा (चिकाटी, अडथळे) दर्जा इत्यादि गोष्टींचा प्रथम विचार करून त्यासाठी पूरक ग्रह रचना आहेत की नाहीत हे मध्यबिंदू ज्योतिष वापरून ठरवावे असे मॅरीने मला सांगितले. मध्यबिंदू ज्योतिषातील गुरु-प्लुटो हा मध्यबिंदू "अमाप यशाचा" कारक सांगितलेला आहे. या बिंदूशी रवी जर युती, प्रतियुती किंवा केंद्र योग करत असेल तर त्या व्यक्तींचा आयुष्यात कधीना कधी उत्कर्ष होतोच. पुढे परिशिष्टामध्ये १९३५-८५ मध्ये जन्मलेल्या ज्या व्यक्तीच्या पत्रिकेत गुरु-प्लुटो हा मध्यबिंदू रवीशी युती करतो, त्यांच्या तारखा दिल्या आहेत.

उत्कर्षाचे इतरही काही मध्यबिंदू सांगितलेले आहेत. त्या सर्वांचा इथे विचार करता येणे शक्य नाही.

जाता जाता भारतीय ज्योतिषी एक चूक वर्षानुवर्षे करत आले आहेत त्यांचा उल्लेख केल्या शिवाय राहवत नाही. समजा एक नोकरी करणारी एक व्यक्ती आहे. ही व्यक्ती इमाने इतबारे आपले नेमून दिलेले काम पार पाडत आहे. मात्र या व्यक्तीच्या बढतीची जेव्हा वेळा आली तेव्हा तेव्हा ग्रहमान अनुकूल असूनही नशीबाने हूलकावणी दिली. असे का व्हावे या प्रश्नाचे उत्तर शोधताना भारतीय ज्योतिषी त्या व्यक्तीची मूळ पत्रिका उलटसूलट करून तपासत राहतात. पण अशा वेळेला जर त्या व्यक्तीची पत्रिका जर तिच्या वरिष्ठांशी ’जूळवून’ बघितली तर बढती का नाकारली गेली याचे उत्तर पट्कन सापडते. आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी यातलाच हा प्रकार... असो.

परिशिष्ट (तुमच्या परिचायात या जन्म तारखाना कुणी जन्मलेले आयुष्यात यशस्वी ठरले आहे का ते तपासा आणि मला जरूर कळवा)


१६ ०९ १९३५ ते १७ ०९ १९३५
१ १० १९३६ ते २ १० १९३६
१८ १० १९३७ ते १९ १० १९३७
४ ०५ १९३८ ते ५ ०५ १९३८
२२ ०५ १९३९ ते २३ ०५ १९३९
८ ०६ १९४० ते १० ०६ १९४०
२६ ०६ १९४१ ते २८ ०६ १९४१
१४ ०७ १९४२ ते १५ ०७ १९४२
३० ०७ १९४३ ते ३१ ०७ १९४३
१३ ०८ १९४४ ते १५ ०८ १९४४
२९ ०८ १९४५ ते ३० ०८ १९४५
१३ ०९ १९४६ ते १४ ०९ १९४६
२८ ०९ १९४७ ते २९ ०९ १९४७
१३ १० १९४८ ते १४ १० १९४८
३० १० १९४९ ते ३१ १० १९४९
१६ ०५ १९५० ते १७ ०५ १९५०
४ ०६ १९५१ ते ५ ०६ १९५१
२२ ०६ १९५२ ते २३ ०६ १९५२
१० ०७ १९५३ ते ११ ०७ १९५३
२७ ०७ १९५४ ते २८ ०७ १९५४
१२ ०८ १९५५ ते १३ ०८ १९५५
२७ ०८ १९५६ ते २८ ०८ १९५६
११ ०९ १९५७ ते १२ ०९ १९५७
२६ ०९ १९५८ ते २७ ०९ १९५८
१२ १० १९५९ ते १३ १० १९५९
२७ १० १९६० ते २८ १० १९६०
१२ ०९ १९६१ ते १३ ०९ १९६१ ते
३० ०५ १९६२ ते १ ०६ १९६२
३० ०९ १९६२ ते १ १२ १९६२
१९ ०६ १९६३ ते २० ०६ १९६३
७ ०७ ९६४ ते ८ ०७ १९६४
२५ ०७ १९६५ ते २६ ०७ १९६५
१२ ०८ १९६६ ते १३ ०८ १९६६
२८ ०८ १९६७ ते २९ ०८ १९६७
१२ ०९ १९६८ ते १३ ०९ १९६८
२७ ०९ १९६९ ते २८ ०९ १९६९
१२ १० १९७० ते १३ १० १९७०
२८ १० १९७१ ते २९ १० १९७१
१२ ०९ १९७२ ते १३ ०९ १९७२
२९ ०९ १९७३ ते ३० ०९ १९७३
१७ १२ १९७४ ते १८ १२ १९७४
६ ०७ १९७५ ते ७ ०७ १९७५
२५ ०७ १९७६ ते २६ ०७ १९७६
१२ ०८ १९७७ ते १४ ०८ १९७७
३० ०८ १९७८ ते ३१ ०८ १९७८
१५ ०९ १९७९ ते १६ ०९ १९७९
३० ०९ १९८० ते १ १० १९८०
१५ १० १९८१ ते १६ १० १९८१
३१ १० १९८२ ते १ ०९ १९८२
१५ ०९ १९८३ ते १६ ०९ १९८३
३० ०९ १९८४ ते १ १२ १९८४
१७ १२ १९८५ ते १८ १२ १९८५

२ टिप्पण्या:

sudeepmirza म्हणाले...

well... just a curiosity...
the dates given here do not feature Jan-Apr period

most of them fall in Aug-Oct ...

Why so?

Rajeev Upadhye म्हणाले...

@Sudeep Mirza

Essentially these dates are solutions of a constraint satisfaction problem in astrology. The pattern you observed is due to very slow motions of Pluto and and Jupiter. Pluto hasnt completed a revolution of zodiac under the period under consideration. So its perfectly normal. We may get new date pattern if we go on adding more constraints.

I hope this clarifies....

Regards

Rajeev Upadhye