रविवार, ५ जून, २०११

समान संधीचा जमाखर्च

अधुनमधुन कोणत्या ना कोणत्या समाजातून समान संधी नाकारल्याची ओरड होते. आरक्षणासाठी आंदोलने होतात. पुरेशी डोकी फुटली की सरकार आरक्षण जाहिर करते. आरक्षण जाहिर झाले की सहसा एका पात्र व्यक्तीच्या तोंडातला घास काढून तो दूसर्‍या कमी पात्रतेच्या तोंडात घातला जातो. याला काही अपवाद असतात की जे मिळालेल्या संधीचे सोने करतात (रिक्षावाल्याचा मुलगा सीए झाला, भेळवाला इंजिनिअर होऊन अमेरीकेला गेला अशा मथळ्याच्या बातम्या वृत्तपत्रात अधेमधे वाचायला मिळतात).असे अपवाद हे अपवाद असल्याने संख्येने तुरळकच असतात.

समजा एखाद्या क्षेत्रात क्ष टक्के आरक्षण एखाद्या समाजासाठी आहे. म्हणजे १०० मधल्या क्ष जागा लायकी असलेल्या पण आरक्षणाचा लाभ घेऊ न शकणार्‍या व्यक्तीना उपलब्ध नाहीत. आता मला सतावणारा प्रश्न असा की समजा या जागाना मुकलेल्या क्ष टक्के व्यक्तींची एकूण कार्यक्षमता आणि या जागांचा फायदा घेतलेल्यांची एकूण कार्यक्षमता, किंवा समाजाला योगदान याचा जमाखर्च कधी कुणी मांडायचा प्रयत्न करते का?

1 टिप्पणी:

mynac म्हणाले...

उपाध्ये साहेब तुम्ही म्हणता कि 'आता मला सतावणारा प्रश्न असा की समजा या जागाना मुकलेल्या क्ष टक्के व्यक्तींची एकूण कार्यक्षमता आणि या जागांचा फायदा घेतलेल्यांची एकूण कार्यक्षमता, किंवा समाजाला योगदान याचा जमाखर्च कधी कुणी मांडायचा प्रयत्न करते का?"
उत्तर : नाही
प्रश्न :का ?
उत्तर :त्याची गरज नाही कारण एकदा निवडून आल्यावर सत्ता ही फक्त ५ वर्षेच राबविता येते.त्या मुळे पुढचे पुढे बघू किंवा जो कोणी पुढे येईल तो बघेल मला काय त्याचे नि आत्ता ह्या ५ वर्षात आपण त्याचा कशाला विचार करत बसायचा,नि डोके खराब करून घायचे,नि लोकांनाच रोष ओढवून घ्यायचा" ही वृत्ती स्वाभाविकपणे बळावते/बळावली आहे:)