रविवार, ६ मार्च, २०११

सन २०११ मध्ये सक्रिय झालेले अपयशाचे मध्यबिंदू

मागील एका पोस्टमध्ये अपयश आणि वैफल्याचे योग दाखवणार्‍या मंगळ-शनी = रवि ही रचना ज्या पत्रिकांमध्ये तयार झाली आहे, त्या पत्रिकांची जंत्री दिली होती. पण यातील सन २०११ मध्ये गोचर (म्हणजे चालू - इंग्लिशमध्ये ट्रान्झीट) ग्रहांमुळे सक्रिय असलेल्या जन्मतारखा कोणत्या हे कळले तर भाकीतात अधिक अचूकता आणता येईल.

आता ही गोष्ट तपासायला ज्योतिषातील एक तत्त्व आपल्याला उपयोगी पडेल. ते असे, मंदगती (म्हणजे गुरु, शनी युरेनस नेपच्य़ून, प्लुटॊ) ग्रहांची भ्रमणे आयुष्यातील मोठी स्थित्यंतरे घडवून आणतात. तूर्त गुरु यातून आपण बाजूला ठेवू कारण तो सहसा "शुभ" मानला गेलेला आहे. गोचर गुरु, पत्रिकेतील रवि, चंद्र, लग्न आणि ख-मध्य यावरुन जात असेल किंवा युती, प्रतियुती अथवा केंद्र योग करत असेल आणि तरीही कुणी अपयश अनुभवत असेल तर रवि, चंद्र, लग्न आणि ख-मध्य यांच्याबरोबर तयार झालेले मध्यबिंदू तपासायलाच हवेत. शिवाय शनी युरेनस नेपच्य़ून, प्लुटॊ यांची भ्रमणे पण तपासायला हवीत. म्हणून तूर्त आपण सन २०११ करता शनी युरेनस नेपच्य़ून, आणि प्लुटॊ यांचाच विचार करणार आहोत.

सन २०११ मध्ये प्लुटोने सक्रिय झालेल्या अपयशी जन्मतारखा (+।- २ दिवस)

सन २०११ मध्ये प्लुटो सायन मकर राशीत ५ अंश १९ मि पासून ते ७ अंश १९ मि असे भ्रमण करतो. या भ्रमण काळात तो ९ एप्रिल २०११ ला वक्री होऊन सायन मकर रास ४ अंश ५३ मि पर्यंत पोचतो व परत १६ सप्टेंबरला मार्गी होतो. थोडक्यात या वर्षी प्लुटोचा एकूण प्रवास सायन मकर रास ४ अंश ५३ ते ७ अंश ३० मि असा आहे. प्लुटोच्या या भ्रमणाने सायन मेष, कर्क, तूळ आणि मकर राशींतील ४ अंश ५३ ते ७ अंश १९ मि हे क्षेत्र प्रभावित झाले आहे. या क्षेत्रामध्ये ज्यांच्या पत्रिकेत जर काही ग्रह असतील तर प्लुटोच्या भ्रमणाचा अनुभव येईलच पण या क्षेत्रात जर मंगळ-शनी=रवी ही रचना तयार झाली असेल तर त्या लोकांना हे भ्रमण विशेष त्रासदायक जाईल. विशेषत: जीवावरची दूखणी, वैफल्यात एक प्रकारची अपरिहार्यता अनुभवायला येईल.
२६ मार्च १९३६
२८ जून १९७२
२९ जून १९५७
२७ डिसेंबर १९६९
२८ डिसेंबर १९३६

सन २०११ मध्ये नेपच्यूनने सक्रिय झालेल्या अपयशी जन्मतारखा (+।- २ दिवस)

सन २०११ मध्ये नेपच्यून सायन कुभ राशीत २६ अंश ४४ मि पासून ते २८ अंश ४५ मि असे भ्रमण करतो. या भ्रमण काळात तो ३ जून २०११ ला वक्री होऊन सायन मीन रास ० अंश ५५ मि पर्यंत पोचतो व परत १६ सप्टेंबरला मार्गी होतो. थोडक्यात या वर्षी नेपच्यूनचा एकूण प्रवास सायन कुंभ रास २६ अंश ४४ मि ते सायन मीन रास ० अंश ५५ मि असा आहे. नेपच्यूनच्या या भ्रमणाने सायन कुंभ-मीन, वृषभ, सिंह-कन्या आणि वृश्चिक-धनू राशींतील २६ अंश ४४ मि ते ० अंश ५५ मि मि हे क्षेत्र प्रभावित झाले आहे. या क्षेत्रामध्ये ज्यांच्या पत्रिकेत जर काही ग्रह असतील तर नेपच्यूनच्या भ्रमणाचा अनुभव येईलच. पण या क्षेत्रात जर मंगळ-शनी=रवी ही रचना तयार झाली असेल तर त्या लोकांना कलह, गैरसमज, भ्रमनिरास, शारीरिक अथवा मानसिक विकलतेला सामोरे जावे लागेल.
१७ मे १९६०
१८ ऑगस्ट १९६९
२१ ऑगस्ट १९६६
२२ ऑगस्ट १९६१
२२ ऑगस्ट १९३६
१८ नोव्हेंबर १९४२
२२ नोव्हेंबर १९६७
२२ नोव्हेंबर १९७३
१५ फेब्रुअरी १९६४
१६ फेब्रुअरी १९५७

सन २०११ मध्ये युरेनसने सक्रिय झालेल्या अपयशी जन्मतारखा (+।- २ दिवस)

सन २०११ मध्ये युरेनस सायन मीन राशीत २६ अंश ५७ मि पासून ते सायन मेष ४ अंश ३३ मि असे भ्रमण करतो. या भ्रमण काळात तो १० जुलै २०११ ला वक्री होऊन सायन मेष रास ० अंश ३८ मि पर्यंत पोचतो व परत १० डिसेंबरला मार्गी होतो. थोडक्यात या वर्षी युरेनसचा एकूण प्रवास सायन मीन रास २६ अंश ५७ ते सायन मेष रास ४ अंश ३३ असा आहे. युरेनसच्या या भ्रमणाने सायन मीन-मेष, मिथुन-कर्क, कन्या-तूळ आणि सिंह-मकर राशींतील २६ अंश ५७ मि पासून ते ४ अंश ३३ मि हे क्षेत्र प्रभावित झाले आहे. या क्षेत्रामध्ये ज्यांच्या पत्रिकेत जर काही ग्रह असतील तर युरेनसच्या भ्रमणाचा अनुभव येईलच पण या क्षेत्रात जर मंगळ-शनी=रवी ही रचना तयार झाली असेल तर त्या लोकांना हे भ्रमण विशेष त्रासदायक जाईल. "अचानक" निर्माण होणारी आजारपणे, अपघात इत्यादि युरेनसच्या या भ्रमणात दिसून येतात.
१८ मार्च १९५९
१९ मार्च १९३५
२१ मार्च १९६६
२६ मार्च १९३६
१८ जून १९३५
१७ जून १९७७
२० जून १९६२
२३ जून १९४७
२० सप्टेंबर १९६३
१९ सप्टेंबर १९६८
२० सप्टेंबर १९३८
२२ सप्टेंबर १९८३
२५ सप्टेंबर १९५३
१८ डिसेंबर १९७४
१९ डिसेंबर १९४४
२४ डिसेंबर १९६६
२७ डिसेंबर १९६९


सन २०११ मध्ये शनीने सक्रिय झालेल्या अपयशी जन्मतारखा (+।- २ दिवस)

सन २०११ मध्ये शनी सायन तूळ राशीत १६ अंश ३९ मि पासून ते २८ अंश २१ मि असे भ्रमण करतो. या भ्रमण काळात तो २६ जानेवारी २०११ ला वक्री होऊन सायन तूळ रास १० अंश २६ मि पर्यंत पोचतो व परत १० जूनला मार्गी होतो. थोडक्यात या वर्षी शनीचा एकूण प्रवास सायन तूळ रास १० अंश २६ मि ते सायन मेष रास २८ अंश २१ मि असा आहे. शनीच्या या भ्रमणाने सायन तूळ, मकर, मेष आणि कर्क राशींतील १० अंश २६ मि पासून ते २८ अंश २१ मि हे क्षेत्र प्रभावित झाले आहे. या क्षेत्रामध्ये ज्यांच्या पत्रिकेत जर काही ग्रह असतील तर शनीच्या भ्रमणाचा अनुभव येईलच पण या क्षेत्रात जर मंगळ-शनी=रवी ही रचना तयार झाली असेल तर त्या लोकांना हे भ्रमण विशेष त्रासदायक जाईल. दीर्घ आजारपणे, अपघात इत्यादि शनीच्या या भ्रमणात दिसून येतात.
६ एप्रिल १९६७
७ एप्रिल १९७६
१२ एप्रिल १९४६
१३ एप्रिल १९५८
१४ एप्रिल १९६१
१८ एप्रिल १९५२
८ जुलै १९८२
१२ जुलै १९६७
१५ जुलै १९५६
१६ जुलै १९५२
२१ जुलै १९६४
१५ ऑक्टोबर १९५६
१६ ऑक्टोबर १९४५
१८ ऑक्टोबर १९७०
१९ ऑक्टोबर १९४०
१९ ऑक्टोबर १९८५
१९ ऑक्टोबर १९६५
२२ ऑक्टोबर १९५५
८ जानेवारी १९८५
११ जानेवारी १९५२
१३ जानेवारी १९४६
१४ जानेवारी १९६२
१६ जानेवारी १९५५
१९ जानेवारी १९७७

1 टिप्पणी:

अनामित म्हणाले...

प्रथम यश आणि अपयश यांच्या सर्वमान्य व्याख्या अस्तित्वात नाहीत याची नोंद घेणे जरूर आहे