मंगळवार, १५ मार्च, २०११

४ एप्रिलचा गुढीपाडवा- हिंदूंचा नववर्ष दिन अशुभ

भारतीयांच्या मुहूर्तांसंबंधी काही चमत्कारिक कल्पना आहेत. त्या ठाम विश्वासाने ते पाळतात. गुढीपाडवा, दसरा कोणत्याही ग्रहयोगात सापडला असला तरी ते त्याला "शुभ"च मानतात. कोणत्याही पंचांगकर्त्या ज्योतिर्विदाने याची दखल घेतलेली मला तरी आठवत नाही.

आता हेच बघा!

दिनांक ३ एप्रिल २०११ रोजी सायन मेष राशीत १३ अंश ३३ मि वर अमावस्येची चंद्र-सूर्य युती होत असून ही अमावस्या अनेक अशुभ योग करते. स्पष्टच लिहायचे झाले तर ही अमावस्या
- प्लुटोबरोबर केंद्र योग
- नेपच्य़ून बरोबर अर्धकेंद्र योग, नेपच्य़ूनचा शनीबरोबर षडाष्टक योग
- शनीबरोबर प्रतियुती

या शिवाय मंगळ-हर्षलची अंशात्मक अपघातकारक युतीमुळे हा कालावधी अत्यंत त्रासदायक बनला आहे.

सांगायचे तात्पर्य एवढेच की ४ एप्रिलचा गुढीपाडवा हिंदूंचा नववर्ष दिन असला तरी अशुभ बनला असल्यामुळे शक्यतो कोणतीही नवी सुरुवात (नवी वाहन खरेदी अथवा गृह खरेदी इत्यादि ) या दिवशी करू नये. केलीच तर ती अशुभ योगांवर झाल्यामुळे त्रास झाल्याशिवाय राहणार नाही.

अनेक अशुभ योग सक्रिय झाल्यामुळे मोठा जनसमुदाय या ग्रह योगांमध्ये सापडतो. म्हणून नेहमी मी करत असलेले बाधित जन्मतारखांचे गणित यावेळेला देत नाही कारण यादी बरीच मोठी होईल.

५ टिप्पण्या:

Ashish Sawant म्हणाले...

पहिल्यांदाच असे वाचायला मिळाले.आमच्यासाठी काय सर्व दिवस सारखेच !!!

अनामित म्हणाले...

संकल्प हा या सृष्टीचा आधार आहे. गुढीपाडवा हा शुभदिवस असल्याचा संकल्प हजारो वर्षांपासून अनेक पिढ्यांनी प्रचलित केला आहे. तो झाकोळणे एखाद्या अशुभ योगाला शक्य आहे असे मला वाटत नाही.

Rajeev Upadhye म्हणाले...

"संकल्प हा या सृष्टीचा आधार आहे" हे वाक्य मला निरर्थक आणि वास्तवाला सोडून वाटते. मनुष्यप्राणि सोडून कोणताही प्राणि संकल्प करतो असे दिसत नाही. संकल्प या शब्दाचा अर्थ आपणाला काय अभिप्रेत आहे? गुढीपाडवा फक्त हिंदू लोक पाळतात. मूर्खपणा अखंडपणे आणि बहूसंख्य लोकांनी केला म्हणजे तो शहाणपणा ठरतो असे तुम्हाला सिद्ध करायचे आहे असे दिसते.

Atul Kumthekar म्हणाले...

bhrashtachar virodhi PUBLIC uposhan karayla kasa aahe bua haa diwas?

iitians kach khanar ase disun rhayley ...

Unknown म्हणाले...

ha divas hinduncha ani marathyancha ashubh divas aahe...Don't celebrate this.