सोमवार, २० फेब्रुवारी, २०१२

अमिताभ बच्चन आणि ज्योतिष

लोकप्रिय अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यावर नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आली आणि त्याच्या दूसर्‍या दिवशी आमचे एक ज्योतिषी मित्र श्री. धोण्डोपंत आपटे यांच्या ब्लॉगवर पुढील टिपण वाचायला मिळाले - http://dhondopant.blogspot.in/2012/02/blog-post_12.html

आमच्या ज्योतिषी मित्राचे भाकीत बरोबर आले याचा आम्हाला आनंद झाला पण दूसर्‍याच क्षणी आमचा चिकित्सक स्वभाव जागा झाला. भारतीय ज्योतिषांचा उत्तर बरोबर आले म्हणजे रीत बरोबर असलीच पाहिजे, अशातला प्रकार असतो. तसे हे नसावे असे मानून मी जालावरून श्री अमिताभ बच्चन यांचे जन्मटिपण मिळवले आणि एबर्टिन पद्धतीने पत्रिका माण्डली. आणि मला वेगळेच चित्र दिसले.

धोण्डोपतांच्या मूळ लेखात ते म्हणतात - "ज्यांचे कुंभ लग्न आहे आणि अष्टमात कन्येचा मंगळ आहे, त्या लोकांनी पोटाची काळजी घ्यावी. या लोकांच्या पोटावर येत्या अडीच वर्षात शस्त्रक्रिया संभवते. त्यामुळे पोटाची काळजी घ्यावी (स्वतःच्या).

सुप्रसिद्ध अभिनेते श्री. अमिताभ बच्चन यांचेही कुंभ लग्न आणि अष्टमात कन्येचा मंगळ आहे. श्री. बच्चनसाहेबांनी येत्या अडीच वर्षात पोटाची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यांना पोटासंबंधी विकार या काळात संभवतात."

आता अष्टम स्थानाचा संबंध (माझ्या माहितीप्रमाणे) जननेंद्रियांशी मानला गेला आहे. प्रत्यक्षात श्री बच्चन यांच्या पोटावर शस्त्रक्रिया झालेली आहे. एकवेळ, जननेंद्रियाजवळचा पोटाचा भाग असावा म्हणून याकडे दूर्लक्ष करता येऊ शकते. पण ग्रहांची भ्रमणे बघता, धोण्डोपंतानी साडेसातीवरून हे भाकीत कसे वर्तवले हे मला कोडेच आहे.

प्रत्यक्षात, श्री अमिताभ बच्चन यांना
- रवीची आणि चंद्राची अशा दोन साडेसाती चालू आहेत. १+१ =३ अशातला हा भाग असतो. (रवी, चंद्र आणि लग्न यांच्या साडेसाती महत्त्वाच्या असतात. त्यात ख-मध्याचाही विचार व्हायला हवा).

- मूळ जन्मपत्रिकेत लग्न = नेपच्यून = रवी-शनी ही मध्यबिंदू रचना तयार झाली आहे. या रचनेचे फल एबर्टीन पुढील प्रमाणे देतो -lack of vitality.- A mental, emotional or physical crisis. याशिवाय सक्रिय झालेला जन्म पत्रिकेतला रवि आणि मंगळ पुढील रचना दाखवतात.

रवि= मंगळ = शनी - लग्न
"A keen awareness of the lack in freedom of movement, a strong desire
to go one's own ways in life. Difficult circumstances of living,
suffering from conditions of the environment , the process of getting ill,
the act of separation." (COSI, page193)

- सध्या गोचर नेपच्यूनचा जन्ममंगळाशी १३५ अंशाचा षडाष्टक(केंद्रयोगाच्या दर्जाचा) त्रासदायक योग होतो. नेपच्यून हा कमकुवतपणा आणि संसर्ग, विषबाधा इत्यादींचा कारक ग्रह आहे. श्री बच्चन यांचा मंगळ अष्टम स्थानात आहे.
- थोड्याच दिवसात नेपच्यऊन जन्मरवीशी १३५ अंशाचा षडाष्टक योग करेल आणि हा योग वक्री मार्गी भ्रमणाने जवळ्जवळ वर्षभर चालू असल्याने हे दूखणे चिघळणार हे नक्की. त्यात एप्रिल २०१२ मधली पौर्णिमा गोचर नेपच्यूनशी आणि जन्मरवीशी त्रासदायक योग करत असल्याने एप्रिल महिना तब्येतीच्या दृष्टीने त्रासदायकच ठरणार असे वाटते. थोडे पुढे जाऊन म्हणायचे झाले तर हे दूखणे जिवावर बेतणारे ठरु शकते.

३ टिप्पण्या:

वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र मार्गदर्शन शिकवणी वर्ग म्हणाले...

राजीव यांस
आपला लेख वाचला, फ़क्त आपल्या स्वार्थासाठी ह्या ....... वापर करुन लोंकाची अभिलाषा मिळवणारे लोक जगात अनेक जन आहेत. पण सत्य सांगण्याची वृत्ती फ़क्त काही जणामध्ये असते. लोकाच्या लेखाला व त्याच्या कठोर लिहण्यावरती जबाब देण्याची वृत्ती फ़ार थोड्यालोकात असते. ज्योतिष्याला विचारलेल्या प्रश्नाची व त्यांनी दिलेल्या उत्तराची आपल्या चूक अथवा बरोबर का? किंवा का नाही ह्याची सुध्दा उत्तरे देण्याची जबाबदारी हाडाच्या व कठोर परिश्रम घेऊन ह्या शास्त्रात उतरलेल्या ज्योतिष्याची असते. उगाच ६ ८ १२ मध्ये राहून एकाच मार्गाने चालु्ना संभ्रमात ठेऊन आपला ठसा कसा उमटावा व स्वार्थकसा साधावा हे त्याच्या जवळुन शिकावे आपल्या साईडवर किती आले व किती गेले त्याचा हिशेब न करता ह्या शास्त्राचा लोकऊपयोगी कसे होऊ ह्याचा विचार पहिल्यादा करावा. जर हे शास्त्र आपणास फ़ार अवगत असेल तर आपण राजीव सारखे अमावस्या व पोर्णिमा शुभ व अशुभ सारखे लेख लिहले असते. किंवा निवडणुकीचा निकाल बद्दल ठाममताने आपल्या साईडवर लिहला असता.
के.पी फ़क्त १ ते २४९ मध्ये सिमीत आहे. त्यावर संशोधन करने फ़ार जरुरी आहे. मी माझ्या लेखात नुकतीच सुरुवात केली आहे. त्याचा लाभ जाणकार लोंकानी घेण्यास माझी अनुमती आहे. तसेच त्यावर भाष करण्यास माझी मुळीच अडगाटी नाही किंवा आपले विचारलेले प्रश्नाना पंता सारखे प्रसिध्द न करण्याचे माझ्या विचार सरणित बसत नाही.
माझी मराठी लिहण्या मध्ये चूक होऊ शकते. पण आपणास उत्तरे मिळतील त्याबद्दली आपणास मान काही धनराशी खर्च करावी लागेल. पण सार्वजनिक प्रश्नाना जे आपल्या सारख्या अनेक जातकाशी संबधीत असतील त्याचे तोडगे व उत्तरे जाहिर प्रमाणे देण्यास मी बधकारक असेल.

संजीव

धोंडोपंत म्हणाले...

नमस्कार उपाध्ये,

आत्ताच तुमच्या या लेखाची लिंक वैभवने पाठवली. लेख वाचला.

तुमच्या प्रश्नांची (कन्येचा मंगळ अष्टमात, त्याचा पचनसंस्थेशी संबंध वगैरे) याबाबतची उत्तरे आमच्या ब्लॉगावर लेखाद्वारे लिहू. त्याची लिंकही तुमच्या ब्लॉगावर देऊ.

आमच्या ब्लॉगावर तुमच्या लेखाची लिंक देऊन मग त्याबाबतचे स्पष्टीकरण देऊ.

बाकी लेखाला आलेल्या अभिप्रायातल्या निराधार हेत्वारोपांना उत्तरे देण्याइतका वेळ आमच्याकडे नाही, हे तुम्ही जाणताच.

I have better jobs to do. But I will certainly address the issues concerning the shaastra, you have raised in your article.

आपला,
(शास्त्रशुद्ध) धोंडोपंत

धोंडोपंत म्हणाले...

प्रिय उपाध्ये,

तुम्हांला सांगितल्याप्रमाणे आम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरे देणारा लेख लिहिला आहे. त्याची लिंक खालीलप्रमाणे

http://dhondopant.blogspot.in/2012/03/blog-post_12.html

कृपया ही लिंकही प्रकाशित करावे.

तसेच पुन्हा आमच्या लेखनाचा संबंध येईल त्या लेखाची लिंक आम्हांला पाठवावी. म्हणजे त्याला त्वरीत उत्तर देता येईल.

धन्यवाद आणि शुभेच्छा.

धोंडोपंत