मंगळवार, १९ एप्रिल, २०११

*अत्यंत शुभ योगातील ३ मे रोजीची अमावस्या*

आगामी काळात सायन वृषभ राशीत (१२ अंश ३० मि) ३ मे २०११ रोजी होणारी अमावस्या काही प्रथम दर्जाच्या शुभ योगांदरम्यान होत असल्याने बर्‍याच जणाना शुभ फलदायी ठरण्याची शक्यता आहे.

१ मे रोजी होणारी मंगळ-गुरु युती सायन मेष २२ अंश २० मि
११ मे रोजी होणारी गुरु-शुक्र युती सायन मेष २४ अंश ४६ मि
१२ मे रोजी होणारी बुध-गुरु युती सायन मेष २४ अंश ४९ मि

ज्यांच्या पत्रिकेत रवि, चंद्र, लग्न व ख-मध्य वरील अंशांशी युती, लाभ अथवा नवपंचम योग करत असतील त्याना आगामी मे महिना कोणत्या ना कोणत्या कारणासाठी शुभ ठरायची शक्यता आहे.

बराच मोठा जनसमुदाय या ग्रहयोगांमध्ये येत असल्याने नेहेमीचे प्रभावित जन्मतारखांचे गणित यावेळेस पण देता येत नाही याची नोंद घ्यावी.

गुरुवार, ७ एप्रिल, २०११

पुरूषानो या नव्या कायद्याला( बदलाना ) कडाडुन विरोध करा

आज सकाळ मध्ये विवाह कायद्यातील ब दलांविषयी एक बातमी प्रसिद्ध झाली आहे. या बातमीचा दूवा असा आहे -
http://www.esakal.com/esakal/20110407/5049728020328664240.htm

या नवीन बदलांनूसार स्त्रीला नवर्‍याच्या संपत्तीत थेट वाटा द्यावा असे सूचविण्यात आले आहे. लग्नाच्या वेळेला नवर्‍याच्या नावावर असलेल्या संपत्तीत वाटा घटस्फोटित पत्नीला मिळावा अशी ही शिफारस आहे.

हा बदल अजून शिफारस या पातळीवर असल्याने शयातील त्रुटींवर चर्चा निश्चितच होईल. आपल्या कडे कायदे करताना त्यांचा दूरूपयोग होणार नाही याची काळजी घेतली जाते का? या बद्द्ल मी साशंक आहे.

हे संभाव्य बदल पुरुषांचा घात करणारे आहेतच पण त्यामूळे उपस्थित हॊणारे प्रश्न असे आहेत -

० हा कायदा जरी शोषित स्त्रीयांना डोळ्यासमोर ठेवून केला असला तरी मुकत स्त्रीया याचा गैरफायदा घेऊ शकतात. केवळ संपत्तीच्या हव्यासापोटी ३-४ लग्न करणार्‍या स्त्रियांची अनेक उदाहरणे ऐकायला मिळतात. या प्रकारामध्ये या प्रस्तावित बदलामुळे वाढ होईल. एवढेच नाही तर संपत्ती बळकवण्यासाठी खोट्या धमक्या देण्याचे प्रकारही वाढतील. नुकत्याच पुण्यात झालेल्या एकाच कुटुंबातील सर्वांच्या आत्महत्येची आठवण ताजी असेल.

० वडलांच्या संपत्तीत समान वाटा असताना घटस्फोटीत नवर्‍याच्या संपत्तीत वाटा देणे म्हणजे पुरूषांना केवळ ओरबाडणे हाच कायद्याचा हेतू आहे.
० लग्नाच्या वेळेला स्त्रीच्या नावावर असलेल्या संपत्तीची अशी समान वाटणी झालेली मुक्त स्त्रीयांना चालेल का?
० या प्रस्तावित बदलांना माझ्या दृष्टीने एकच उतारा आहे - तो म्हणजे विवाहपूर्व लिखित करार करणे. त्याला दूर्दैवाने अजून कायदेशीर मान्यता नाही

पुरूषानो या नव्या कायद्याला( बदलाना ) कडाडुन विरोध करा

मंगळवार, ५ एप्रिल, २०११

झाशीच्या राणीवरील अन्याय

झी टिव्ही वरील झांसी की रानी ही मालिका मी बर्‍यापैकी नियमितपणे पहातो. पुण्यात राहून शाळेच्या पुस्तकात किवा इतर माध्यमातून झाशीच्या राणीच्या कर्तृत्वाचा यथार्थ परिचय कधिच झाला नव्हता. शाळेच्या इतिहासाच्या पुस्तकात दोन-चार ओळीत तिला गुंडाळण्यात आले होते.

टिव्ही वर चालू असलेली मालिका इतिहासाचे reconstruction आहे, हे मला मान्य आहे. त्यामुळे काही ठिकाणी (प्रसंगात) विशेषत: संवादामध्ये ही मालिका दर्जा घसरून हिंदी सिनेमा प्रमाणे संवंग बनते. त्यामुळे तपशीलाचा अपवाद केला तर मालिकेत चित्रीत केलेल्या घटना या अस्सल असाव्यात ( म्हणजे कपोलकल्पित नसावेत). कारण तसं झाल नसतं तर इतिहास बदलला म्हणून टिकेची झोड उठवायला लोकांनी कमी केले नसते.

काल या मालिकेत एक महत्वाची घटना दाखवली गेली. ती म्हणजे नेल्सन नावाच्य ईस्ट इंडिया कंपनीच्या क्रूर अधिकार्‍याला झाशीच्या राणीने हत्तीच्या पायी दिले.

झाशीच्या राणीच्या कारकिर्दीतील ही घटना मला तिच्या लढयातील कळसाध्याय वाटली. कारण ब्रिटिशांच्या सत्तेला इतका मोठा झटका एका स्त्रीने दिला याचे कौतुक वाटते. अफझलखानाच्या वधानंतर आपल्या इतिहासात वध सांगितला जातो तो चाफेकरांनी केलेला रॅण्ड्चा. पण त्याच वेळेस महाराष्ट्रातील इतिहासकारानी झाशीच्या राणीच्या अतुल्य शौर्यावरून जो बोळा फिरवला आहे त्याचे दू:ख झाले.

रविवार, ३ एप्रिल, २०११

हा ध्वजाचा अपमान नाही का?

काल वल्डकप जिकल्यानंतर स्टेशियम वर जो उन्माद बघायला मिळाला त्यात एक घॄणास्पद गोष्ट बघायला मिळाली. हरभजनसिंग आणि युवराजने राष्ट्रीय ध्वज चेहेर्‍यावरचा घाम पुसायला तसेच नाक पुसायला वापरला. सचिनने तर स्वत:ला राष्ट्रध्वजामध्ये शाली सारखे लपेटून घेतले होते. ही गोष्ट कितीजणांच्या लक्षात आली कुणास ठाऊक?.

मला तरी या प्रकाराची आणि या खेळाडूंची काल किळस आली.