मंगळवार, २४ मे, २०११

परवाचीच गोष्ट ... दोन भूभूंची (पुन: प्रकाशित)

परवाचीच गोष्ट ... दोन भूभूंची
(काही सत्य घटनांवर आधारीत)
शेवटी एकदाचा मॉन्सुन येऊन ठेपला आणि मला विद्यापीठात चालायला जायची हूक्की
आली. गाडी काढली आणि विद्यापीठ गाठले. छत्रपतींच्या पुतळ्याजवळ गाडी पार्क करून
बाहेर पडलो आणि बारीक तुषार अंगावर येण्यास सुरुवात झाली होती.

तोंडाने मल्हारच्या सुरांचे नोम-तोम आळवत चालायला सुरुवात केली. पुणे
विद्यापीठाविषयी मला तसे काही फारसे प्रेम किंवा अभिमान नाही, पण शुद्धहवेची
हमी देणार्‍या ज्या काही थोड्याफार पुण्यात जागा आहेत त्यातली एक जागा एवढेच
माझ्यादृष्टीने त्या परिसराचे महत्त्व.


चालता चालता मुख्य-इमारतीपाशी येऊन पोचलो आणि पुढे आयुका पर्यंत जावे आणि
आकाशगंगेतले तारे मोजून परत फिरावे असा विचार केला. मल्हार गुणगुणत चालता
चालता काही वर्षापूर्वी म्हणजे १९९१ साली घडलेला एक किस्सा आठवला. तोंडाने चालू
असलेला मल्हार बंद पडला आणि एकदम हसू फुटले.

असेच पावसाचे दिवस होते. मी तेव्हा संगणकशास्त्र विभागात नोकरी करत होतो.
दुपारी जेवायला एमबीए कॅन्टीन किंवा ओल्ड कॅन्टीनला जायचे असा नेम होता.
तेवढ्यात समोरून एक मोठा ट्रक बांधकामाचे साहित्य घेउन हळूहळू चालला होता.
विद्यापीठातील विद्येच्या उजेडाने त्या बिचार्‍या ट्रकवाल्याचे डोळे दिपले
असावेत आणि त्यामुळे तो रस्ता चुकला असावा.

मी विरुद्ध दिशेने येत असल्याचे बघून तो ट्रक माझ्यापाशी येऊन थांबला आणि
जागेवरूनच ड्रायव्हरने विचारले,

"साब, यहाँ होटल किदर है?"

"होटल? कौनसा होटल? यहाँ तो कोई होटल नही हैं". मी उत्तरलो.

त्यावर त्याने खिशातून एक कागद काढला आणि हात बाहेर काढून माझ्यासमोर धरला.
त्या कागदावर लिहिलेला पत्ता वाचून मी खोखो हसायला लागलो. तो पत्ता असा होता-

होटल आयुका
पुना युनिव्हर्सिटी कॅंपस
मेन बिल्डींग के आगे
पिन ४११००७

मी का हसत होतो ते त्या ट्र्कवाल्याला काही कळणे शक्य नव्हते. आकाशगंगेतल्या
समस्त ता‍र्‍याना मात्र ते कळले असावे कारण ते काही क्षण चमकायचे थांबले असा
मला भास झाला. मी त्याला हॉटेल आयुकाची दिशा सांगितली आणि पोटपुजेसाठी भरभर
पावले उचलायला सुरुवात केली.

हळु हळु दिवस जात होते. 'होटल आयुका' धीम्या गतीने उभे राहत होते. मी वरील
प्रसंग विसरून गेलो होतो. एक दिवस माझ्या आयायटीतल्या एका मित्राचा मला अचानक
फोन आला. आम्ही दोघे एकाच होस्टेल आणि डिपार्टमेंट्चे. फक्त मी त्याला बराच
सीनियर होतो. मित्राने मला सांगितले की तो कसल्याशा सिम्पोझियमसाठी तो 'आयुका'त
आला होता. त्याला थोडा वेळ होता म्हणून त्याने मला फोन करून बोलावले होते. मी
हातातलं काम टाकून
आयुकाच्या दिशेने निघालो.

बर्‍याच वर्षानी भेटत असल्यामुळे सुरुवातीच्या गप्पाटप्पा होस्टेलच्या
आठवणीभोवती रंगल्या. मी हळुच त्याला प्रश्न विचारला.

"तू, या सिम्पोझियममध्ये काय करतोय"

"काही नाही. सकाळपासून संध्याकाळपर्यंत वचवच ऐकायची"

"आणि मग?" - मी

"Some lucky souls find here their scientific husbands and scientific wives"

"what next?"

"here you 'mate'(!) with your scientific
husbands or scientific wives and have fun... "

"इथेच?" - मी चक्रावून विचारले

"हो तर. देन वी प्रोड्युस न्यु थिअरीज"

मला 'होटल आयुका' शोधणार्‍या ट्रक ड्रायव्हरची आठवण झाली. मी तो किस्सा
मित्राला सांगितला तेव्हा तो पण खळखळून हसला. यावर आम्ही एकमेकांचा निरोप घेतला
आणि निघालो.

पावसाची रिपरिप वाढली तशी माझी पावले भरभर पडायला सुरुवात झाली. आयुकाच्या
अभेद्य तटबंदीजवळ मी येउन पोचलो होतो. तिथे आडोशाला दोन कुत्री उभी होती. पाउस
कमी झाल्यावर पुढे चालावे असा विचार करून मीपण चंद्र्शेखर ऑडिटोरियमजवळ आसरा
शोधला आणि पाउस कमी व्हायची वाट बघत उभा राहीलो.

आजुबाजुला फारसे कोणी नव्हते. तेवढ्यात ती दोन कुत्री माझ्या दिशेने आली आणि
जोरजोरात भूंकू लागली. सुरुवातीला मी दूर्लक्ष केले, पण त्यांचे भूंकणे काही
थांबेना म्हणून जवळ पडलेला दगड मी त्यांना मारण्यासाठी भिरकावणार एवढ्यात
लांबून एक वॉचमन ओरडला -

"साब! उनको पत्थर मत मारो!"

"क्यूं. काटेंगे तो आपके साब दवा पानी करेंगे क्या?" मी चिडून विचारले.

एकाच वेळेला वॉचमन आणि ती कुत्री भूंकत माझ्याकडे यायला सुरुवात झाली. वॉचमन
जवळ आला आणि माझ्या कपाळावरच्या आठ्या बघून मला म्हणाला,

"साहेब, रागवू नका पण एक विचारू का?

मी मानेनेच हो म्हटले.

"तुम्ही ज्योतिषी आहात का?"

कुत्री अचानक भूंकायची थांबली.

"हो! का?"

"काही नाही. इथली कुत्री ज्योतिषांवर खूप खवळतात."

"का? काय झालं"

"मागे इथल्या काही साहेब लोकांनी ज्योतिषाची टेस्ट घेतली आणि त्यात ज्योतिषी
फेल झाल्याच त्यांनी एकतर्फी जाहिर केलं तेव्हापासून इथल्या कुत्र्यांना
ज्योतिषांचा जरा देखिल वास लागला तरी ती खवळतात."

ते ऐकून मी पण चिडलो.

"ज्योतिषांची टेस्ट घ्यायला तुमचे साहेब कोण लागून गेले" - मी पण आता खवळलो
होतो.

कुत्री जोरजोरात भूंकायला लागली.

"आंतरराष्ट्रीयकीर्तीचे शास्त्रज्ञ". वॉचमनने भाषांतर केले...

"मग मी पण सांगेन ती टेस्ट करणार का"

कुत्र्यांनी प्रश्नार्थक शेपूट हलवली.

"तुमच्याच लायब्ररीमधली गेल्या दहा वर्षात प्रसिद्ध झालेली कोणतीही १०० पुस्तके
डोळे मिटून उचला आणि किती पुस्तकात तुमच्या साहेबांचे नाव सापडते ते नीट मोजून
सांगा"


आता वॉचमन प्रश्नार्थक नजरेने कुत्र्यांकडे बघू लागला. कुत्र्यांना माझा प्रयोग
पटला की नाही ते माहित नाही पण शेपूट पायात घालून त्या सारमेयांनी घूमजाव केले.

पाउस थांबला होता. मी पण घराच्या दिशेने चालायला सुरुवात केली...

सोमवार, १६ मे, २०११

दिनांक २ जून २०११ रोजीचे खंड्ग्रास सूर्यग्रहण

दिनांक २ जून २०११ रोजी सायन मिथुन राशीत ११ अंशावर अमावस्येची रवि-चंद्र युती होत असून हे या वर्षातील दूसरे सूर्यग्रहण आहे. हे ग्रहण खंडग्रास आहे. पश्चिमोत्तर भारताच्या काही भागात हे ग्रहण जेमतेम १० टक्के दिसेल तर युरोपात ६० ते ८० टक्के दिसेल.

ग्रहणाची ही अमावस्या फक्त एकच गोचर योग करते तो म्हणजे शनीशी नवपंचम योग करते. मात्र सायन तूळ राशीत असलेला शनी मात्र बुध, युरेनस, प्लुटॊ याच्यांशी त्रासदायक योग करतो. दीर्घकाळ चाललेल्या प्रयत्नाना दिशा मिळणे , अडचणीतून मार्ग निघणे अशी या अमावस्येची सर्वसाधारण फले असली तरी मूळ पत्रिकेतील ग्रहांच्या संक्रियतेनूसार कमीजास्त त्रासदायक फले या अमावस्येच्या पुढे मागे चार-पाच दिवस काही जन्म-तारखाना मिळू शकतात.

खाली दिलेल्या जन्मतारखांच्या पत्रिकेत अमावस्येमुळे मंगळ सक्रिय होतो. त्यामुळे जन्मपत्रिकेत मंगळाने केलेल्या योगानुसार ग्रहणातील अमावस्येची शुभाशुभ फले मिळु शकतात.

२९ सप्टेंबर १९३५ ते ५ ऑक्टोबर १९३५
२६ जानेवारी १९३६ ते ३१ जानेवारी १९३६, २६ मे १९३६ ते १ जून १९३६, ११ ऑक्टोबर १९३६ ते १७ ऑक्टोबर १९३६
२७ ऑगस्ट १९३७ ते ३ सप्टेंबर १९३७
२ जानेवारी १९३८ ते ८ जानेवारी १९३८, ७ मे १९३८ ते १३ मे १९३८, २२ सप्टेंबर १९३८ ते २८ सप्टेंबर १९३८
१३ फेब्रुअरी १९३९ ते २० फेब्रुअरी १९३९, ३ डिसेम्बर १९३९ ते ९ डिसेम्बर १९३९
१५ एप्रिल १९४० ते २१ एप्रिल १९४०, ३ सप्टेंबर १९४० ते ९ सप्टेंबर १९४०
१८ जानेवारी १९४१ ते २४ जानेवारी १९४१, २९ मे १९४१ ते ५ जून १९४१
२२ मार्च १९४२ ते २९ मार्च १९४२, १५ ऑगस्ट १९४२ ते २२ ऑगस्ट १९४२
२८ डिसेम्बर १९४२ ते ३ जानेवारी १९४३, २९ एप्रिल १९४३ ते ४ मे १९४३, १० सप्टेंबर १९४३ ते १९ सप्टेंबर १९४३, ५ डिसेम्बर १९४३ ते १६ डिसेम्बर १९४३
६ फेब्रुअरी १९४४ ते १९ फेब्रुअरी १९४४, २७ जुलै १९४४ ते २ ऑगस्ट १९४४, ८ डिसेम्बर १९४४ ते १३ डिसेम्बर १९४४
५ एप्रिल १९४५ ते ११ एप्रिल १९४५, ५ ऑगस्ट १९४५ ते ११ ऑगस्ट १९४५
६ जुलै १९४६ ते १३ जुलै १९४६, १९ नोव्हेंबर १९४६ ते २४ नोव्हेंबर १९४६
१६ मार्च १९४७ ते २१ मार्च १९४७, १४ जुलै १९४७ ते १९ जुलै १९४७
८ जून १९४८ ते १६ जून १९४८, २९ ऑक्टोबर १९४८ ते ४ नोव्हेंबर १९४८
२३ फेब्रुअरी १९४९ ते २८ फेब्रुअरी १९४९, २३ जून १९४९ ते २८ जून १९४९, १२ नोव्हेंबर १९४९ ते २० नोव्हेंबर १९४९
८ ऑक्टोबर १९५० ते १४ ऑक्टोबर १९५०,
३ फेब्रुअरी १९५१ ते ८ फेब्रुअरी १९५१, ३ जून १९५१ ते ९ जून १९५१, २० ऑक्टोबर १९५१ ते २६ ऑक्टोबर १९५१
११ सप्टेंबर १९५२ ते १७ सप्टेंबर १९५२
११ जानेवारी १९५३ ते १७ जानेवारी १९५३, १४ मे १९५३ ते २० मे १९५३, २९ सप्टेंबर १९५३ ते ५ ऑक्टोबर १९५३
२६ फेब्रुअरी १९५४ ते ६ मार्च १९५४, १७ डिसेम्बर १९५४ ते २२ डिसेम्बर १९५४,
२४ एप्रिल १९५५ ते ३० एप्रिल १९५५, १० सप्टेंबर १९५५ ते १७ सप्टेंबर १९५५,
२८ जानेवारी १९५६ ते ३ फेब्रुअरी १९५६, २० जून १९५६ ते २९ जून १९५६,
१ एप्रिल १९५७ ते ७ एप्रिल १९५७, २२ ऑगस्ट १९५७ ते २८ ऑगस्ट १९५७
५ जानेवारी १९५८ ते ११ जानेवारी १९५८, ९ मे १९५८ ते १५ मे १९५८
२ मार्च १९५९ ते १० मार्च १९५९, ४ ऑगस्ट १९५९ ते १० ऑगस्ट १९५९, १६ डिसेम्बर १९५९ ते २२ डिसेम्बर १९५९
१४ एप्रिल १९६० ते १९ एप्रिल १९६० , १६ ऑगस्ट १९६० ते २२ ऑगस्ट १९६०
१४ जुलै १९६१ ते २० जुलै १९६१, २६ नोव्हेंबर १९६१ ते २ डिसेम्बर १९६१
२४ मार्च १९६२ ते २९ मार्च १९६२, २२ जुलै १९६२ ते २८ जुलै १९६२
२० जून १९६३ ते २८ जून १९६३, ७ नोव्हेंबर १९६३ ते १२ नोव्हेंबर १९६३
२ मार्च १९६४ ते ८ मार्च १९६४, ३० जून १९६४ ते ६ जुलै १९६४, २४ नोव्हेंबर १९६४ ते ३ डिसेम्बर १९६४
२५ मार्च १९६५ ते १३ एप्रिल १९६५, २७ एप्रिल १९६५ ते १८ मे १९६५, १७ ऑक्टोबर १९६५ ते २२ ऑक्टोबर १९६५
१० फेब्रुअरी १९६६ ते १६ फेब्रुअरी १९६६, १० जून १९६६ ते १६ जून १९६६, २८ ऑक्टोबर १९६६ ते ३ नोव्हेंबर १९६६
२३ सप्टेंबर १९६७ ते २९ सप्टेंबर १९६७,
२१ जानेवारी १९६८ ते २६ जानेवारी १९६८, २१ मे १९६८ ते २७ मे १९६८, ६ ऑक्टोबर १९६८ ते १२ ऑक्टोबर १९६८
१९ मार्च १९६९ ते १ एप्रिल १९६९, २२ मे १९६९ ते ३ जून १९६९, ११ ऑगस्ट १९६९ ते २१ ऑगस्ट १९६९
२७ डिसेम्बर १९६९ ते २ जानेवारी १९७०, २ मे १९७० ते ८ मे १९७०, १७ सप्टेंबर १९७० ते २३ सप्टेंबर १९७०
६ फेब्रुअरी १९७१ ते १३ फेब्रुअरी १९७१, २३ नोव्हेंबर १९७१ ते २९ नोव्हेंबर १९७१
१० एप्रिल १९७२ ते १६ एप्रिल १९७२, २९ ऑगस्ट १९७२ ते ४ सप्टेंबर १९७२
१३ जानेवारी १९७३ ते १८ जानेवारी १९७३, २१ मे १९७३ ते २७ मे १९७३
१५ मार्च १९७४ ते २२ मार्च १९७४, ११ ऑगस्ट १९७४ ते १७ ऑगस्ट १९७४, २३ डिसेम्बर १९७४ ते २९ डिसेम्बर १९७४
२३ एप्रिल १९७५ ते २९ एप्रिल १९७५, ३० ऑगस्ट १९७५ ते ६ सप्टेंबर १९७५
२२ जुलै १९७६ ते २८ जुलै १९७६, ३ डिसेम्बर १९७६ ते ९ डिसेम्बर १९७६
३१ मार्च १९७७ ते ६ एप्रिल १९७७, ३० जुलै १९७७ ते ५ ऑगस्ट १९७७
३० जून १९७८ ते ७ जुलै १९७८, १४ नोव्हेंबर १९७८ ते २० नोव्हेंबर १९७८
११ मार्च १९७९ ते १६ मार्च १९७९, ९ जुलै १९७९ ते १४ जुलै १९७९, १२ डिसेम्बर १९७९ ते २७ डिसेम्बर १९७९
४ फेब्रुअरी १९८० ते १७ फेब्रुअरी १९८०, २९ मे १९८० ते ७ जून १९८०
२५ ऑक्टोबर १९८० ते ३० ऑक्टोबर १९८०,
१८ फेब्रुअरी १९८१ ते २३ फेब्रुअरी १९८१, १८ जून १९८१ ते २३ जून १९८१, ६ नोव्हेंबर १९८१ ते १३ नोव्हेंबर १९८१
३ ऑक्टोबर १९८२ ते ८ ऑक्टोबर १९८२
२९ जानेवारी १९८३ ते ३ फेब्रुअरी १९८३, २९ मे १९८३ ते ४ जून १९८३, १४ ऑक्टोबर १९८३ ते २१ ऑक्टोबर १९८३
३ सप्टेंबर १९८४ ते ९ सप्टेंबर १९८४
६ जानेवारी १९८५ ते ११ जानेवारी १९८५, ९ मे १९८५ ते १५ मे १९८५, २४ सप्टेंबर १९८५ ते ३० सप्टेंबर १९८५

खाली दिलेल्या जन्मतारखांच्या पत्रिकेत अमावस्येमुळे शनी सक्रिय होतो. त्यामुळे जन्मपत्रिकेत शनीने केलेल्या योगानुसार ग्रहणातील अमावस्येची शुभाशुभ फले मिळु शकतात.

१४ मे १९३५ ते ३० जुलै १९३५
१ फेब्रुअरी १९३६ ते ५ मार्च १९३६
२२ जुलै १९४२ ते २ डिसेम्बर १९४२
१० एप्रिल १९४३ ते १५ मे १९४३
२९ ऑगस्ट १९४९ ते ३० सप्टेम्बर १९४९
२२ एप्रिल १९५० ते ७ जून १९५०
२९ डिसेम्बर १९५६ ते १२ फेब्रुअरी १९५७, ३ मे १९५७ ते ३० जून १९५७
२२ सप्टेम्बर १९५७ ते ६ नोव्हेम्बर १९५७
१० मार्च १९६५ ते १४ एप्रिल १९६५
१७ सप्टेम्बर १९६५ ते ८ जानेवारी १९६६
२४ मे १९७२ ते २४ जून १९७२
८ ऑक्टोबर १९७८ ते २३ नोव्हेम्बर १९७८
२६ जानेवारी १९७९ ते २१ मार्च १९७९, २७ जून १९७९ ते ७ ऑगस्ट १९७९


खाली दिलेल्या जन्मतारखांच्या पत्रिकेत अमावस्येमुळे युरेनस सक्रिय होतो. त्यामुळे जन्मपत्रिकेत युरेनसने केलेल्या योगानुसार ग्रहणातील अमावस्येची शुभाशुभ फले मिळु शकतात.

१ जून १९४४ ते ३ सप्टेम्बर १९४४
४ ऑक्टोबर १९४४ ते १ जून १९४५
२९ ऑक्टोबर १९६३ ते ३ फेब्रुअरी १९६४
११ ऑगस्ट १९६४ ते १६ ऑक्टोबर १९६४
२६ फेब्रुअरी १९६५ ते २ ऑगस्ट १९६५
१ मार्च १९८३ ते २८ मार्च १९८३
२७ नोव्हेम्बर १९८३ ते १२ फेब्रुअरी १९८४
२३ एप्रिल १९८४ ते २३ नोव्हेम्बर १९८४


खाली दिलेल्या जन्मतारखांच्या पत्रिकेत अमावस्येमुळे शनी सक्रिय होतो. त्यामुळे जन्मपत्रिकेत नेपच्यूनने केलेल्या योगानुसार ग्रहणातील अमावस्येची शुभाशुभ फले मिळु शकतात.

११ मार्च १९३५ ते २ ऑगस्ट १९३५
२५ जानेवारी १९७४ ते २९ एप्रिल १९७४
२३ नोव्हेम्बर १९७४ ते १६ ऑगस्ट १९७५
२७ ऑगस्ट १९७५ ते १६ जानेवारी १९७६
१८ मे १९७६ ते १८ नोव्हेम्बर १९७६


खाली दिलेल्या जन्मतारखांच्या पत्रिकेत अमावस्येमुळे प्लुटो सक्रिय होतो. त्यामुळे जन्मपत्रिकेत प्लुटोने केलेल्या योगानुसार ग्रहणातील अमावस्येची शुभाशुभ फले मिळु शकतात.

६ ऑक्टोबर १९६१ ते २१ फेब्रुअरी १९६२
९ ऑगस्ट १९६२ ते ८ ऑक्टोबर १९६३
२९ फेब्रुअरी १९६४ ते ९ ऑगस्ट १९६४

मंगळवार, ३ मे, २०११

भाकीताचा पडताळा

मी दिनांक १९ एप्रिलला लिहिलेल्या खालिल पोस्ट मध्ये आजची अमावस्या मोठ्या जनसमुदायासाठी अत्यंत शुभ ठरेल असे भाकित वर्तवले होते. अमेरिकेने ओसामा बिन लादेन वर केलेल्या कारवाई नंतर माझे भाकित नि:संशय खरे ठरले आहे. नुकत्याच येऊन गेलेल्या आर्थिक मंदीच्या मोठ्या तडाख्याच्या भाकिता नंतर वर्तवलेले हे दूसरे मोठे भाकित खरे ठरले याचा मला आनंद वाटतो.

माझ्या या भाकितावर अनेकजण अचूकता नसल्याचा आरोप करतील, पण माझ्या दृष्टीने त्याला फारसे महत्त्व नाही. कारण ज्योतिषात "कोअर इश्यु" जास्त अचूक पणे वर्तवता येतात. "कोअर इश्यु" कशा स्वरूपात प्रकट होतील हे सांगता येत नाही ही मी अभ्यास केलेल्या ज्योतिष तंत्राची मर्यादा आहे मी प्रांजल पणे नमूद करतो.

आणखी एक सांगण्या सारखी महत्त्वाची म्हणजे "सर्व अमावस्या अशुभ नसतात" या माझ्या निरीक्षणाला या घटनेने पुष्टी मिळाली आहे असो.