शुक्रवार, १० ऑक्टोबर, २००८

[शनी-हर्षल प्रतियोग] दीर्घकाल टिकणारे अस्थैर्य

शनी-हर्षल प्रतियोग - दीर्घकाल टिकणारे अस्थैर्य

आगामी काळात म्हणजे नोव्हेंबर ०८ ते ऑक्टोबर १० या जवळजवळ दोन वर्ष शनी व हर्षल
हे दोन मंदगती ग्रह मार्गी व वक्री गतीने पाच वेळा प्रतियुति हा जोरदार योग
करीत आहेत. सायन राशीचक्रामधिल १८ अंश कन्या ते १ अंश तूळ, १८ अंश मीन ते १ अंश
मेष, १८ अंश मिथुन ते १ अंश कर्क तसेच १८ अंश धनु ते १ अंश मकर हे मॊठे क्षेत्र
या प्रतियोगानी प्रभावित झाले आहे.

शनी हा स्थैर्यकारक आणि हर्षल हा अनपेक्षित घटनांचा कारक ग्रह आहे. हे दोन ग्रह
गोचरीने जेव्हा युति, प्रतियोग, केंद्र इत्यादि योग करतात तेव्हा त्यांच्या
प्रभावाखालिल क्षेत्रात कुंडलीतील रवि, चंद्र, लग्न, दशम-भाव आरंभ बिंदू आले
असल्यास आयुष्यात मोठ्या उलथापालथ करणार्‍या घटनांना अनपेक्षितपणे तोंड द्यावे
लागते. शनी आणि हर्षलच्या योगात दिसून येणारी महत्त्वाची गोष्ट म्हणजे
घडणार्‍या घटना हतबल किंवा उध्वस्त करतात. झंझावातात अडकलेल्या व्यक्ती प्रमाणे
या योगात अनुभव येतात. सध्या पुण्यात "पोलिसराज"चे एक उदाहरण गाजत आहे. ते
शनी-हर्षल प्रतियोगाचे नमुनेदार उदाहरण आहे. दीर्घकाल टिकणारे अस्थैर्य हा
शनी-हर्षल प्रतियोगाचा स्थायीभाव आहे.

वर म्ह्टल्या प्रमाणे जवळजवळ दोन वर्षे हा प्रतियोग चालू राहील. खाली या
योगाच्या तारखा आणि अंश दिले आहेत.

४ नोव्हे. २००८ १८-५७ सायन कन्या-मीन
५ फेब्रु. २०००९ २०-०० सायन कन्या-मीन
१५ सप्टे. २००९ २४-४२ सायन कन्या-मीन
२७ एप्रिल २०१० २८-४६ सायन कन्या-मीन
२६ जुलै २०१० ००-२५ मेष-तूळ

सायन कन्या-मीन राशींचे फार मोठे क्षेत्र या योगात सापडल्या मुळे समाजाचा फार
मोठा वर्ग या योगाच्या तडाख्यात सापडणार आहे. त्यामुळे मागे शनी-मंगळ
युतिमध्ये सापडलेल्या जन्मतारखांप्रमाणे येथे प्रतियुतीमध्ये सापडलेल्या
जन्मतारखांचे गणित मांडणे अशक्य आहे.

वर नमुद केलेल्या अंशामध्ये जन्म पत्रिकेतील रवी असेल तर शारीरिक अस्थैर्य,
चंद्र असेल तर मानसिक अस्थैर्य, बुध असेल तर बौद्धिक अस्थैर्य, शुक्र असेल तर
आर्थिक किंवा सांसारिक अस्थैर्य दीर्घकाल अनुभवास येते.


Regards

Rajeev Upadhye
---------------------------
www.yuyutsu.biz
http://rajeev-upadhye.blogspot.com/
--------------------------

४ टिप्पण्या:

धोंडोपंत म्हणाले...

नमस्कार श्री उपाध्ये साहेब,

शनी-हर्षल प्रतियोगाबद्दल उत्तम लिहिले आहे. अप्रतिम.

पुढील लेखनासाठी शुभेच्छा.

आपला,
(स्नेही) धोंडोपंत

Astro and Vastu Counsellor म्हणाले...

श्री उपाध्ये यास नमस्कार
सायन पद्धती द्वारे आपण आपला लेख उत्तम प्रतिमेने माडला आहे यात शंका नाही त्या पंताचा
शुभच्छा म्हणजे दुधात साखर!

पुढील लेखनासाठी शुभेच्छा.

संजीव

Unknown म्हणाले...

namaskar upadhye saheb,
pahilyandach aapla blog pahila. new cm ashok chavhan yanchya patrikebaddal comment wachali tyamule ustukta aahe ke narayan rane yanchee kashi asel?
aaplyakadun asech changale likhan hot rahave..

regards,
aparna karandikar.

प्रशांत म्हणाले...

महत्त्वपूर्ण माहितीबद्दल धन्यवाद. सायनच्या जोडीला निरयन राशी-अंशही दिलेत तर अभ्यासायला सोपं जाईल.
धन्यवाद.