काल आणि काही दिवसांपूर्वी एक बातमी वृत्तपत्रांमध्ये झळकत आहे. या दोन्ही बातम्यांचे मथळे आणि त्यातील घटनांकडे बघायचा माध्यमांचा आणि (अडाणी) समाजाचा दृष्टीकोन मला कोड्यात टाकतो आहे.
दोन्ही घटनांमध्ये दोन पुरुषांनी सार्वजनिक ठिकाणी हस्तमैथुन केला आहे.
मला मात्र वेगळाच प्रश्न पडला आहे. मुळात हस्तमैथुन ही अश्लील कृती आहे का? या प्रश्नाचे उत्तर वैद्यकीयदृष्ट्या "नक्कीच नाही" असे शहाण्या माणसांचे उत्तर असेल. मग तो सार्वजनिक ठिकाणी केल्याने अश्लील ठरतो का? हे तपासायला हवे. सार्वजनिक ठिकाणी मलमूत्र विसर्जन करणे हे अश्लील कृत्य नक्कीच नाही (तशा बातम्या वृत्तपत्रांमध्ये नक्कीच येत नाही). पण हस्तमैथुन मात्र बातमीचा आणि निषेधाचा विषय ठरतो हे मात्र अगम्य कोडे आहे.
वास्तविक मलमूत्र विसर्जनाप्रमाणे हस्तमैथुनात लैंगिक भावनांच्या कोंडमार्याचा निचरा होतो. मलमूत्र विसर्जनाची सोय नसल्यास लोक उघड्य़ावर ते करतात आणि आपण ते ’स्वीकारतो’! काही आजारात मलमूत्र प्रवृत्तीवरील नियंत्रण कमी होते, ते ही आपण स्वीकारतो. तसेच लैंगिक भावनांच्या विसर्जनाची **सोय नसलेल्या** व्यक्तीने तो उघड्यावर केल्यास त्याकडे सहानुभूतीने पहायला हवे. "अश्लील, अश्लील" असे ओरडून हस्तमैथुनाबद्दल गैरसमज तसेच वाढत राहतील.
या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी "कामाच्या ठिकाणी हस्तमैथुन" या विषयावरील पाश्चात्य वृत्तपत्रातील चर्चा वाचनात आली. (http://metro.co.uk/2017/01/20/we-tried-masturbating-at-work-for-a-week-and-this-is-what-happened-6393673/). मग डोक्यात उजेड पडला - जे प्रश्न समाजाला सोडवता येत नाहीत ते एक तर नाकारायचे किंवा प्रश्न उपस्थित करणार्यांचे तोंड दाबून टाकायचे किंवा त्या व्यक्तीला विकृत ठरवायचे, एव्हढेच समाजाला येते.
आय०आय०टीत असताना मी माझ्या एका डॉक्टर मित्राला माझ्या हस्तमैथुनाबद्दलच्या काही शंका विचारल्या होत्या. तेव्हा त्याने एक छान उत्तर दिले होते. तो म्हणाला - "शरीरात जे पदार्थ बाहेर टाकण्यासाठी निर्माण होतात, ते बाहेरच पडायला हवेत. ते शरीरातच ठेवणे अजिबात हितावह नसते."
असो. या विषयाच्या अनुषंगाने बरेच लिहीण्यासारखे आहे. पण पुन्हा एखादी "अश्लील कृत्याची" बातमी वृत्तपत्रात येईल तेव्हा...