What is the purpose of sex in (civilized) human life?
हा प्रश्न मी अनेक विचार करणार्या (किंवा तसा दावा करणार्या) अनेक लोकांना विचारला आहे आणि संधी मिळेल तेव्हा अजुनही विचारतो. या प्रश्नाची प्रमुख दोन उत्तरे मला वाचन, संवाद किंवा निरीक्षणातून मिळाली आहेत.
ती अशी -
० सेक्स निसर्गामध्ये प्रजनना व्यतिरिक्त एकत्रितपणे आनंद उपभोगायचा मार्ग आहे कारण त्यातुन bonding शक्य होते. हा आनंद एकतर्फी, संमतीशिवाय घेतला गेला तर ती सहसा वासना, बळजबरी, हिंसा असते.
० सेक्स हा फक्त प्रजननासाठी असतो.
यातील दूसरे उत्तर देणार्यांचा विचारवंतांचा गट प्राणी जगताकडे बोट दाखवतो. मनुष्येतर प्राणी फक्त प्रजोत्पादनासाठी मैथुन करतात. आनंदासाठी किंवा bonding साठी नाही, असे या गटाचे म्हणणे असते. साहजिक प्रजोत्पादना व्यतिरिक्त सेक्सची गरज ही विकृती किंवा वासना मानण्याकडे या गटाचा कल असतो. या गटाला मनुष्य पॉलिगॅमस आहे हे स्वीकारता येत नाही किंवा स्वीकारायचे नसते. तसे स्वीकारले गेले तर माणसाच्या मनुष्यत्वाला कुठेतरी धक्का लागत असावा. आता माणसाचे मनुष्यत्व कशात आहे, हा प्रश्न मला तरी अनिर्णित आहे असे मला वाटते. कारण प्रत्येक मनुष्यसमूहानूसार मनुष्यत्वाच्या कल्पना बदलू शकतात.
पण ’सेक्स हा फक्त प्रजननासाठी असतो’ असे मानणा-यांचा गट जेव्हा प्राणी जगताकडे बोट दाखवतो तेव्हा काही गोष्टींकडे कानाडोळा करतो.
० प्राणीजगतात कोणत्याही नराला किंवा मादीकडे कोणत्याही नराकडे किंवा मादीकडे केव्हाही जाता येते.
० प्राण्यांमध्ये प्रजोत्पादनानंतर नर आणि मादी आपापल्या दिशेने जाउ शकतात. कुणाचीही जबाबदारी कुणावरही नसते.
म्ह० वरील मूळ प्रश्नाचे उत्तर म्हणून "प्रजनानासाठी सेक्स" हे तत्त्व स्वीकारताना प्राणी जगतातील इतर संकेतांकडे कानाडोळा केला. कारण ते गैरसोयीचे ठरणार असल्याने स्वीकारता येणार नाहीत. गैरसोयीच्या प्रश्नांना वेगवेगळ्या तर्हेने बेदखल करणे यात मात्र माणसाचे मनुष्यपण नक्की सामावले आहे.
मानववंशशास्त्राच्या थोड्य़ाशाही परिचयाने धर्म आणि संस्कृतीने लादलेल्या काही ’उदात्त’ कल्पना कोलमडून पडतात त्या अशा...