भारताबाहेर अनेक जिज्ञासु लोक ज्योतिषातील सत्यासत्यतेचा शोध घेण्यात गुंतलेले आहेत. अमेरीकेतील National Council for Geocosmic Research ही अशीच एक संस्था. या संस्थेचे एक अध्वर्यु श्री आल्फी लाव्होइ हे अनेक वर्षे ज्योतिषात सांख्यिकीवर आधारीत संशोधन करण्यात गुंतलेले आहेत. माझा आणि त्यांचा परिचय नाही पण मी त्यांच्या याहु ग्रुपचा सभासद असल्याने त्यांच्या संशोधनातील प्रगती मला वरचेवर समजत असते. श्री आल्फी लाव्होइ यांनी http://www.astroinvestigators.com/ असे एक कोषस्थळ आपल्या संशोधनाच्या माहितीकरीता तयार केले असून त्यावरही त्यांचे निष्कर्ष पहाण्यासाठी उपलब्ध आहेत.
श्री आल्फी लाव्होइ यांनी करीअर विषयी केलेल्या संशोधनात काही वेधक गोष्टी सापडल्या आहेत. http://www.astroinvestigators.com/documents/NCGR-Careers-02-25-10.pdf या फाईलवर जर एक नजर टाकली तर असे लक्षात येईल की कोट्यधीशांच्या पत्रिकेत सप्तमात मंगळ असायची तसेच राहु-मंगळ युति असायची शक्यता खूप आहे. हे मुद्दाम सांगायचे कारण असे की हे दोन्ही योग आपल्याकडे कुयोग मानले गेले आहेत. (आमचे एक ज्योतिषी मित्र श्री धोण्डोपंत आपटे यांनी राहु-मंगळ युतिबद्दल लिहीलेली ही नोंद वाचावी - http://dhondopant.blogspot.in/2012/05/blog-post_25.html)
आता कोट्यधीशांच्या पत्रिकेत जर वरील दोन योग प्रामुख्याने आढळत असतील तर सप्तमात मंगळ आणि राहु-मंगळ युति असलेल्या पत्रिका टाकून द्यायची आवश्यकता नाही.
भारतीय ज्योतिषी श्री आल्फी लाव्होइ यांच्या दर्जाचे संशोधन करत नाहीत म्हणुन चेष्टा आणि टिकेचे बळी ठरतात.
टीप - या संशोधनाबद्दल काही शंका असतील तर त्या श्री आल्फी लाव्होइ यांच्याशी संपर्क साधून निरसन करून घ्यावे. मी माझी मते व्यक्त करताना श्री लाव्होइ यांनी अशा संशोधनासाठी लागाणारी शिस्त काटेकोर पणे पाळली असणार हे गृहित धरले आहे.
३ टिप्पण्या:
नमस्कार,
ते संशोधन करत आहेत हे चांगले आहे. सप्तमात मंगळ राहु युती वैवाहिक सौख्यात काय थैमान घालते हे आम्ही चांगलेच अनुभवलेले आहे. आपणही अनेक अशा पत्रिका घेऊन त्या पडताळून पहाव्यात. आमचे म्हणणे पटेल.
लेखात आमच्या नावाचा उल्लेख अप्रस्तुत वाटला.त्याची आवश्यकता नव्हती.
धन्यवाद आणि शुभेच्छा
धोंडोपंत
Ya yutichi fale hi milatatach....mag ti etar patrikechya darjya pramane va dasha pramane kami jast tivratechi asatat etakech..he nusate vachan nahi anubhav aahe..
टिप्पणी पोस्ट करा