२८ ०१ २०१३
संचालक,
राम गणेश गडकरी डॉट कॉम
मी आपल्या "राम गणेश गडकरी डॉट कॉम" या साईटला भेट दिली. आपला उपक्रम स्तुत्य आहेच पण त्यात एक मोठ्ठी त्रुटी राहून गेलेली आहे. ती आपण कृपया तातडीने ती दुरुस्त करावी ही विनंति.
गडकर्यांच्या "एकच प्याला" या नाटकाची पदे (आणि प्रस्तावना) त्यांचे जीवश्च कंठ्श्च मित्र आणि साहित्यिक कै. विठ्ठल सीताराम गुर्जर यांनी लिहीलेली आहेत. आपण तयार केलेल्या "एकच प्याला" या नाटकाच्या इंटरनेट आवृत्तीत आपण पदे अंतर्भूत केलेली आहेत, पण ती कै. विठ्ठल सीताराम गुर्जर यांची असल्याचा कुठेही उल्लेख मला सापडला नाही. यामुळे केवळ कै. विठ्ठल सीताराम गुर्जर यांचे केवळ श्रेय नाकारले जात नसून लोकांमध्ये ही पदे गडकर्यानी रचली अशी चुकीची समजूत पसरण्याची शक्यता खूप आहे, हे आपण लक्षात घ्याल अशी आशा करतो.
आपण ही चूक लवकरात लवकरात दुरूस्त कराल अशी आशा करतो.
कळावे,
आपला
राजीव उपाध्ये
प्रति: rajeev-upadhye.blogspot.com
सर्व इंटरनेट फोरम्स