सोमवार, १६ जून, २००८

वृद्धांच्या समस्येवर जालीम उपाय

संपाद्क
दैनिक सकाळ

आजच्या सकाळ मधिल वृद्धांच्या समस्येवरील वृत्त वाचून त्यातील भीषणतेची कल्पना आली. आपल्याला कल्पना नसेल म्हणून सांगतॊ पुण्यातील कुटुम्ब न्यायालयात प्रॅक्टीस करणारे काही वकील एकाकी वृद्धाना मरण लवकरात लवकर प्राप्त व्हावे म्हणून काही अभिनव उपक्रम राबवतात.

आज काल जरा काही खुट्ट झाले तरी मुक्त स्त्री छ्ळ कायद्याचा आधार घेउन कोर्टाचे दरवाजे ठोठावते आणी "छ्ळ छ्ळ" म्हणून ऊर बडवते. अशा स्त्रीला ती कितीही खोटे बोलली तरी कायद्याचे पूर्ण संरक्षण असते. अशा मुक्त स्त्रीचा छ्ळ होण्यास काहीही कारणे चालू शकतात. घरातील एखाद्या वृद्धव्यक्तीला चहाचा कप द्यावा लागला तरी मुक्त स्त्रीचा छ्ळ होतो.

सकाळ सारखी नपुंसक वृत्तपत्रे डोळ्यावर कातडे ओढून बसली असल्यामुळे कुटुम्ब न्यायालयात बहूतांश दाव्यामध्ये काय चालते हे त्यांना कधिच कळणार नाही.

अशावेळेला अशा अडचण ठरलेल्या वृद्धांना खड्यासारखे बाजूला करण्या साठी छ्ळ कायदा, ४९८-अ इ. कायदे कामी येतात. अशा कायद्यांमध्ये मुक्त स्त्रीवर कॊणतीही गोष्ट सिद्ध करण्याची जबाबदारी नाही. तर आपण निष्पाप आहोत हे पुरूषाला सिद्ध करावे लागते. त्यामूळे सासू-सासरे वगैरे मंडळीना छ्ळाच्या कायद्याखाली गोवले की ते हाय खाऊन मरतात. आणी त्यांनी हाय खाल्ली हे कुठेही सिद्ध होत नाही. तसेच न्यायालये पण खॊट्या दाव्यामुळे पुरुषाचे नुकसान होते हे मान्य करत नाही, हे या कायद्याचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. (चुकून न्यायालयानी हे मान्य केले तर खोट्या दाव्यांचा भार कमी झाल्यामूळे कित्येक वकील भिकेला लागतील). ज्या वृद्ध मंड्ळीकडे थोडीफार मालमत्ता आहे अशांना या कायद्याचा आधार घेऊन सावज बनवता येते.

तर कायद्याच्या या अंगाची जास्तीत जास्त मुक्त स्त्रीयांना माहीती व्हावी या साठी सकाळने पुढाकार घेऊन विद्या बाळांसारख्या विदूषींच्या नेतृत्त्वाखाली कार्यशाळा आयोजित कराव्यात. पुण्याच्या कुटुम्ब न्यायालयात प्रॅक्टीस करणारे काही वकील यासाठी आपल्याला मार्गदर्शन करतीलच.

हा उपक्रम आपण लवकरात लवकर हातात घ्यावा ही विनंती.

कळावे
आपला


राजीव उपाध्ये

शुक्रवार, १३ जून, २००८

सावधान! येत्या १० जुलैची शनी-मंगळ युति


सावधान! येत्या १० जुलैची शनी-मंगळ युति


येत्या दहा जुलै रोजी सायन कन्या राशीत पाच अंशावर शनी मंगळ युति होत आहे। शनी-मंगळ युती आधुनिक ज्योतिषात वैफल्य आणी अडथळे इत्यादींची दर्शक मानतात.

ज्यांच्या पत्रिकेत सायन कन्या, धनू, मीन, मिथुन राशीत ४ ते ६ अंशात कोणतेही ग्रह असतील आणी जर हे ग्रह लग्न रवि, चंद्र, दशमभाव आरंभ-बिंदू यांच्याशी युति, प्रतियुति, केन्द्र, अर्धकेन्द्र योग करत असतील तर या युतीची त्रासदायक फळे अनुभवायला येउ शकतात.

दहा जुलै रोजी रवि-चंन्द्राचा मध्यबिंदू दूपारी ३-४९ वाजता शनी-मंगळाबरोबर युती योग करतॊ. त्यामुळे या युतिचा सर्वात जास्त प्रभाव लाहोर, इस्लामाबाद आणि पश्चिम भारताचा काही भाग यावर पडतॊ. यामुळे ही युती या भागातून काही अशुभ घटना घड्वून आणायची शक्यता आहे। शनि-मंगळ युतीचे प्रभावक्षेत्र वरील नकाशात रंगीत पट्टीने दाखवले आहे।

काही मागील आणि पुढिल शनि-मंगळ युतीच्या तारखा
23 Feb 1988 AD 6:30:45 pm
1 Mar 1990 AD 4:42:48 am
6 Mar 1992 AD 11:21:30 pm
14 Mar 1994 AD 10:30:41 am
22 Mar 1996 AD 7:16:21 am
2 Apr 1998 AD 12:59:28 pm
16 Apr 2000 AD 1:57:43 am
4 May 2002 AD 11:26:13 am
25 May 2004 AD 11:07:38 am
18 Jun 2006 AD 11:32:06 am
10 Jul 2008 AD 11:42:38 pm
31 Jul 2010 AD 1:35:20 pm
15 Aug 2012 AD 4:04:18 pm
26 Aug 2014 AD 1:02:39 am
24 Aug 2016 AD 4:52:02 pm
2 Apr 2018 AD 9:10:49 pm
31 Mar 2020 AD 11:58:36 pm
5 Apr 2022 AD 7:20:17 am
11 Apr 2024 AD 2:04:29 am
20 Apr 2026 AD 4:12:16 am
1 May 2028 AD 4:09:11 am