काही ज्योतिषी (विशेषत: भारतीय ज्योतिषी) फार ठामपणे बोलतात. भारतीयांचे समूहमन
अनिश्चिततेकडे विशिष्ट नजरेतून बघते. प्रत्येक जीवाच्या आयुष्यातील घटनाक्रम हा
पूर्वनियोजित असतो. हा घटनाक्रम फक्त "ज्ञानी" ज्योतिषाला कुंडलीवरून समजतो,
असा ठाम विश्वास भारतीय जातकांमध्ये असतो. त्यामुळे भारतीय जातक ज्योतिषाकडून
अवाजवी अपेक्षा ठेवतात. मी आज कोणत्या रंगाची अंतर्वस्त्रे घातली आहेत, हे पण
ज्योतिषाने ओळखावे अशी अपेक्षा ठेवली जाते. पुष्कळदा ज्योतिषाच्या कक्षेत न
येणार्या समस्या पण ज्योतिषानेच सोडवाव्यात व आपले निर्णय ज्योतिषाने घ्यावे
ही अशीच सर्वत्र अनुभवास येणारी गैरवाजवी अपेक्षा. साहजिक अपेक्षा पूर्ण
करण्याकडे कळत, न-कळत ज्योतिषांचा कल असतो.
याउलट ठराविक काही ज्योतिषी फार गोड बोलतात आणि काही बर्याचदा नकारात्मक
बोलतात. पैकी नकारात्मक भविष्यकथनाची कारणमीमांसा करण्याचा हा एक प्रयत्न...
नकारात्मक भविष्यकथन करणार्यांचेही दोन गट करता येतील. यातील एक गट हा
गैरहेतूने म्हणजे बहूधा धनाच्या लालसेने जातकाना भीतियुक्त दडपणाखाली ठेऊन
वरचेवर नकारात्मक भविष्य सांगतात. 'चांगले न बोलणार्या' ज्योतिषांचा दूसरा गट
आणखी एक गट एका वेगळ्या भूमिकेतून जातकांना सावध करायचे काम करतो. आपण ज्याचा
सल्ला घेतो तो ज्योतिषी कोणत्या गटात मोडतो हे ओळखण्याची जबाबदारी जातकांची
आहे, असे माझे प्रामाणिक मत आहे.
माझं अ-शास्त्रीय (म्हणजे व्यक्तिगत) निरीक्षण असे आहे की नकारात्मक भविष्य
जास्त बरोबर ठरते. याचे महत्वाचे कारण असे की सर्वसाधारणपणे माणसाचा कल हा
विनाशाकडे आहे (Destructive human tendencies surpass cosntructive human
tendencies). कित्येकांना माझे हे विधान पटणार नाही पण संपूर्ण मानवजातीचा
आजवरचा इतिहास हेच सांगतो. प्रगत असो अथवा अप्रगत मानवसमाजाचे अस्तित्वाचे
प्रश्न, वेदना संख्येने जास्त व गंभीर आहेत. सुखे थोडी आणि दू:खे फार आणि
म्हणूनच मानवी आयुष्यात घडणार्या नकारात्मक घटनांचे प्रमाण जास्त आहे. हे झाले
नकारात्मक भविष्यकथनाचे प्राथमिक कारण. आता पूर्णपणे ज्योतिषाच्या चौकटीतून या
प्रश्नाचे उत्तर शोधायचा प्रयत्न करतो...
अतिशय चांगले (बृहत्त्रिकोण, बृहदायत) आणि अतिशय त्रासदायक (बृहच्चौकोन) असे
तुरळक दिसणारे योग (म्हणजे भौमितिक रचना) सोडले सर्वसाधारणपणे पत्रिकेत चांगले
आणि वाईट असे दोन्ही योग असतात. बृहत्त्रिकोण, बृहदायत, व बृहच्चौकोन
असणार्या पत्रिकांमध्ये चांगले अथवा वाईट भाकित ठामपणे करता येते. पण अन्य
पत्रिकांमध्ये त्रासदायक योगांचा विचार अगोदर करावा लागतो. त्रासदायक कालावधी
आपण कसा हाताळतो यावर नंतर येणारा भाग्यकारक ग्रहांचा सक्रियतेचा काळ अवलंबून
असतो. एखादी व्यक्ती खड्ड्यात पडली तर ती सावरून उभी राहील की नाही ते खड्डा
किती खोल आहे यावर अवलंबून असते. तसेच त्या व्यक्तीच्या जवळच्या सहवासातील
व्यक्तींचे ग्रह जर पीडित व्यक्तीला परतपरत खड्ड्यात ढकलत असतील म्हणजेच
नकारात्मक प्रतिसाद देत असतील तर मूळ पत्रिकेतील भाग्यकारक ग्रहांची साथ पुरेशी
पडत नाही. साहजिकच भाग्यकारक ग्रहांचे आणि त्यानी केलेल्या योगांचे परिणाम हे
त्रासदायक योगांच्या पार्श्वभूमीवर तपासावे लागतात.
जाता जाता भारतीय ज्योतिषांची एक खोड येते उघड केल्याशिवाय मला राहवत नाही. ती
म्हणजे सूताने स्वर्ग गाठणे. एका पत्रिकेवरून चराचर सृष्टीचे भविष्य सांगायचा
प्रयत्न करतात. यामूळे लोकांच्या अवाजवी अपेक्षा वाढतात. एखाद्या प्रश्नाचा
विचार करताना त्यासंबधित सर्व व्यक्तींच्या सर्व पत्रिका तपासल्याशिवाय कोणतेही
उत्तर देऊ नये. ज्योतिषात वापरल्या जाणार्या प्रत्येक तंत्राच्या मर्यादा
सल्ला देण्यापूर्वी जातकांना सांगणे हे प्रत्येक ज्योतिषाचे नैतिक कर्तव्य आहे
असे माझे स्पष्ट मत आहे.
५ टिप्पण्या:
Dear Rajiv,
I am Sunil Joshi, a member of Chitpawan grp. reading your writting frequently. I like your views about astronomy and other. thanks for adding some knowledge to people like us who are lay persons when it comes to astronomy. do write for us.
Sunil Joshi
9930580082 (Mumbai)
नमस्कार उपाध्येसाहेब
लेख आवडला. काही नकारात्मक भविष्यकथन करणारे लोकांना कसे खड्ड्यात घालतात ते आम्ही पाहिले आहे. त्या विद्वानांची (?) आठवण झाली.
आपला,
(स्नेही) धोंडोपंत
नकारात्मक भविष्य का सांगितले जाते?
" आत्मासम्भाविता: स्तब्धा धनमानमदन्विता: | यजन्ते नामयज्ञैस्ते दम्भेनाविधिपूर्वकम् ॥१७॥ "
""श्रीमभ्दगवग्दीता पान २३८ गीताप्रेस गोरखपुर""
आपल्याला श्रेष्ठ मानणारे आणि सदैव उध्दट असणारे व घमेंडखोर लोक, धन साणि मान यांच्या खोट्या प्रतिष्ठेने मदांध - उन्मत्त झालेले आसुरी लोक कधीकधी शास्त्रांच्या विधिविधानांचे \ पाखंडीपणाने शास्त्रविधिहीन कींवा विधिविधानांवे पालन न करता, अहंभावाने केवळ नाममात्र यज्ञ करतात या मुळे नकारात्मक भविष्य सांगितले जाते.
संजीव नाईक
वास्तु आणि ज्योतिष समोपदेशक
१००% सहमत
Hmm. Pan kahi jyotishi bhavishyat kahi vait / vilambit goshti aahet he sangayache nasel tar sandigdh / gulmulit bolatat he pan titakech khare. Ashyane lokancha jyotish shastravar vishwas tikel ka?
टिप्पणी पोस्ट करा