एबर्टीन ज्योतिष आणि स्वाईन फ्लु
एका याहूग्रुपवर एका ज्योतिषनिंद्काने प्रश्न विचारला की ज्योतिषांनी स्वाईन फ्लुचे भविष्य का वर्तवले नाही. हा प्रश्न मला उद्देशून असावा कारण मी त्या ग्रुपवरील ज्योतिषाचा खंदा समर्थक आहे. वास्तविक ऑक्टोबर २००८ मध्ये लिहिलेल्या एका टिपणात मी जे ग्रहयोगांचे वर्णन केले आहे, ते जिज्ञासूनी येथे http://rajeev-upadhye.blogspot.com/2008/10/blog-post.html अवश्य वाचावे.
आधुनिक ज्योतिष (विशेषत: एबर्टीनचे तंत्र) एखाद्या घटनेतील core issues (स्थायीभाव) चे भाकीत वर्तवण्यास कसे उपयोगी पडते हे यावरून समजून घेता येईल. 'अस्थैर्य' हे हर्षल आणि शनीच्या योगात दिसून येते. 'अनपेक्षित' हा एकच शब्द हर्षलचे वर्णन करण्यास पाश्चात्य ज्योतिषी पुरेसा मानतात. शनी-हर्षलच्या प्रतियोगात आपण वेगवेगळ्या प्रकारचे 'अनपेक्षित अस्थैर्य' अनुभवत आहोत. प्रथम आर्थिक मंदी, मग २६ नोव्हेंबरचे अरिष्ट आणि आता स्वाईन फ्लु मला वाटतं ज्योतिषाची उपयुक्ततता पटण्यास हा अनुभव पुरेसा आहे.
'स्वाईन फ्लूची साथ" येईल असे शब्द माझ्या भाकीतात नाहीत असा आक्षेप काही नतद्र्ष्ट ज्योतिषाचे निंदक घेतील. त्याचे स्पष्टीकरण असे -
- माझ्या ज्योतिषाच्या अभ्यासाच्या वैयक्तिक मर्यादा
मी साथीच्या रोगांचा आणि ज्योतिषाचा संबंध अभ्यासलेला नाही. ज्योतिषाचा सर्वसमावेशक अभ्यास एका व्यक्तीस तिच्या एका आयुष्यात शक्य नाही.
- मी जे तंत्र (एबर्टीन) वापरतो त्याची मर्यादा
वर अगोदरच म्हटल्या प्रमाणे एबर्टीनचे तंत्र एखाद्या घटनेतील फक्त core issues (स्थायीभाव) चे भाकीत वर्तवण्यास उपयोगी पडते. ग्रहयोगांच्या सक्रियतेच्या कालावधीत ज्या मोठ्या घटना घडल्या त्यांचा स्थायीभाव तो माझ्या भाकितात अचूकपणे आला आहे. एबर्टीन तंत्राच्या मूळ दाव्याशी हे सुसंगत आहे असे मला वाटते.
जाता जाता स्वाईन फ्लूच्या साथी मध्ये कुणी विशेष काळजी घ्यायची त्यासंबंधी सूचना -
ज्यांच्या पत्रिकेत शनी आणि नेपच्युन angular आहेत म्हणजे लग्न आणि दशमभाव आरंभ बिंदूशी युती करत आहेत किंवा जन्मरवीशी युती, प्रतियुती, केंद्र अर्धकेंद्र इ योग करत आहेत त्यांची प्रतिकारशक्ती जन्मत: कमी असते.
याशिवाय ज्यांच्या पत्रिकेत गोचर शनी किंवा गोचर नेपच्यून जर जन्मरवीशीवरील (म्हणजे युती, प्रतियुती, केंद्र अर्धकेंद्र इ) प्रमाणे योग करत असेल तर अशी मंडळी साथीच्या रोगांनी पट्कन आजारी पडतात.
स्वाईन फ्लूच्या साथीमूळे स्वर्गात गणपतीने मात्र नक्कीच सूटकेचा नि:श्वास टाकला असेल, हे मात्र खरे...
२ टिप्पण्या:
स्वाईन फ्लूच्या साथीमूळे स्वर्गात गणपतीने मात्र नक्कीच सूटकेचा नि:श्वास टाकला असेल, हे मात्र खरे..
agadi khare :)
bappa also needs some privacy isnt it?
राजीव उपाध्ये उर्फ युयुत्सु,
आपल्या आधीच्या लेखातील भाष्य... आयुकाच्या आंगणातील कुत्र्यांचे भुंकणे व नंतर शेपूट घालणे ... आवडले.
मी काही न ठरवता सध्या मिपावर व उपक्रमवर नाडीग्रंथांवरील माझ्या लेखनामुळे राळ उडवली जात आहे, हे आपण वाचता आहात. पण या निमित्ताने मिपा व उपक्रम, मनोगत व अ्ऩ्य प्रो-अंनिस विचारधारावाल्यांशी त्यांच्याच व्यासपीठावरून प्रत्यावाद करणाऱ्यांशी भेट होत आहे. जे विरोधक कधीच समोर यायचे नाहीत ते लेखनाच्या माध्यमातून तरी पुढे येत आहेत. आता त्यांना नाडी ग्रंथाच्या परीक्षेला अंनिसच्या महत्वाच्या व्यक्तींना यायला भरीला पाडावे व त्यांनाही ते जमले नाही तर तेच अंनिसचे आपोआप विरोधक होतील निदान समर्थक राहणार कि नाही याचा विचार करतील इतपत त्यांना खेचत रहावे असे वाटते. यावर आपले विचार जाणून घ्यायला आवडेल. माझ्या मो नं 9881901049 वर संप्रक केला तरी चालेल.
टिप्पणी पोस्ट करा