आताच 'उपक्रम' वरील श्री शरद कोर्डे यांचे सृजनशीलतेवरील लिखाण वाचले. तेथे त्यांनी सृजनशीलता जोपासण्या साठी वेगवेगळी तंत्रे सांगीतली आहेत. यात एका तंत्राचा उल्लेख सापडला नाही ज्याचा मी विषेश अभ्यास केला आहे. हे तंत्र म्हणजे नादोपचाराचे तंत्र. यात आपला मेंदू हव्या त्या अवस्थेत नेता येतो. मेंदूच्या या अवस्थांची गॅमा ४० Hz, बीटा (२०-१३Hz), अल्फा (१३-१०), थीटा (१०-४) व डेल्टा (४ - ०) अशी विज्ञानाने सर्वसाधारण वर्गवारी केली आहे. या अवस्थांमध्ये मेंदू वेगवेगळी कार्ये करतो.
सुप्त मनावर असलेली जागृत मनाची पकड ढिली पडली की नवनिर्मिती घडू लागते. माणसाचा मेंदू अल्फा-थीटा अवस्थांमध्ये आंदोलित होतो तेव्हा सुप्त मनात दडलेल्या असंख्य गोष्टी बाहेर येउ लागतात. ज्यांना हा अनुभव घ्यायचा आहे त्यानी http://www.freewebs.com/yuyutsu/musictherapy.htm या लिंक वर जाउन् काही 'फुकट' असलेले ट्रॅक्स ऐकून पहावेत. माझे Inner Voice 1 आणि Alpha Magic हे ट्रॅक्स जगभरातील लोकाना खुप आवडले आहेत. सुप्त मनातील खजिन्याचा शोध घेण्यास ते नक्की उपयोगी पडतील.
हे ट्रॅक्स ऐकताना दिलेल्या सूचना काटेकोर पणे पाळाव्यात...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा