दिनांक ३० सप्टेंबर २०१२ निरयन मीन-कन्या राशीत १३ अंश ४३ मि वर पौर्णिमा होत असून ही पौर्णिमा अत्यंत अभद्र आणि स्फोटक बनली आहे. ही पौर्णिमा स्फोटक बनण्याची करणे पुढील प्रमाणे
० पोर्णिमेच्या चंद्राची हर्षल बरोबर १ अंशात युति
० पोर्णिमेच्या चंद्राचा प्लुटो बरोबर केंद्र योग
० पोर्णिमेच्या अगोदर २५ सप्टेंबर २०१२ रोजी मंगळ-प्लुटो अर्धकेंद्र योग, मंगळ-हर्षल त्र्यर्धकेंद्र योग आणि मंगळ-नेपच्यून केंद्र योग
थोडक्यात २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर हा कालावधी ज्योतिष दृष्ट्या अत्यंत घाणेरडा आहे. मोठे अपघात, घातपात याविषयी बातम्या याकालावधीत जर ऐकू आल्या नाहीत तर ते एक मोठ्ठे आश्चर्य ठरेल. ज्यांच्या पत्रिकेत निरयन मिथुन-कन्या-धनु-मीन या राशीत १० ते १५ अंश या क्षेत्रात जर एखादा ग्रह किंवा ग्रहयोग होत असेल तर ही पोर्णिमा बरीच त्रासदायक ठरायची शक्यता आहे.
टीप - यावेळेस सायन गणित न करता भारतीय पद्धती प्रमाणे निरयन गणित केले आहे. बरेच मोठे क्षेत्र या ग्रहयोगांच्या प्रभावाखाली येत असल्याने नेहेमीचे जन्मतारखांचे गणित यावेळेस देता येत नाही.
1 टिप्पणी:
Thanks Sir ..
टिप्पणी पोस्ट करा