सोमवार, २९ जुलै, २०१३

सूक्ष्मकथा - ६मला लोकांची (आणि पर्यायाने समाजाची)
एक गोष्ट कळत नाही...

तुम्ही त्यांच्याबरोबर शर्यतीत भाग घेतला तर
त्यांना तुम्हाला हरवायचे असतं
मग तुम्ही शर्यत जिंकू नये म्हणून
ते काहीही करतात...
अगदी शर्यतीतून बाहेर पण काढतात...

पण नियती गंमत करते,
ती तुम्हाला अशा ठिकाणी ठेवते की
तिथे हारजित काहीही नसतं...

मग हेच लोक
तुम्ही शर्यतीत भाग घेत नाही
म्हणुन तुम्हाला दोष देत राहतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: