संगीतात हास्य रस नसतो असं म्हणतात. पण या समजाला आह्वान/छेद देतील अशा काही रचना मला अलिकडेच ऐकायला मिळाल्या. कुणाला हसवुन हसवुन मारायचे असल्यास या रचना ऐकवाव्यात. या कलाकृती सादर करणार्या कलाकारांच्या प्रयोगशीलतेचे कौतुक करावे तेव्हढे मात्र थोडेच आहे.
http://www.youtube.com/watch?v=GUAnlLnEuXo
http://www.youtube.com/watch?v=NeBqfDL77wA
यातली १ली पाश्चात्य रचनाकार रॉसिनी याच्या "विल्यम टेल" या रचनेवर आधारीत आहे. एक आई तिच्या मुलाना २४ तासात काय काय ऐकवते हे अनिता रेन्फोर्ट या गायिकेने २ मि ५५ से मध्ये बसवले आहे. हे सर्व कुठेही न अडखळता, कागद हातात न धरता सादर करायचे तिचे कौशल्य अचाट आहे.
२ री आणि ३री रचना मात्र भारतीय संगीतावर इंग्लिश शब्द प्रयोगांनी बांधल्या आहेत. २री रचना पोट धरधरून हसवते.
पुण्यात पूर्वी आफळेबुवा म्हणुन एक कीर्तनकार इंग्लिश्मध्ये कीर्तन करायचे त्याची या निमित्ताने आठवण झाली.