बर्नार्ड बेल बरोबरच्या माझ्या प्रकल्पाला डॉ. भटकरानी आपटवलं याची पॉसिबल वाटणारी काही कारणं खूप उशीरा लक्षात आली. मला मिळणार्या प्रसिद्धीत त्यांना वाटा मिळत नव्हता हे आहेच, पण या प्रकल्पाच्या चर्चा चालु असताना एका बैठकीत बर्नार्ड बेल समोर एक गाजर भटकरांनी टाकलं होतं. बर्नार्डच्या बायकोच्या बॅलेला रु १५००० सीडॅक मदत करेल असं ते गाजर होतं. आम्हाला दोघानाही त्याचा अर्थ तेव्हा लक्षात आला नाही. आमच्या प्रकल्पातुन भटकराना काहीच ’फायदा’ दिसत नव्हता. फायदा म्हणजे - संयुक्त परिषदांमध्ये अध्यक्षीय भाषण करण्यासाठी आमंत्रणं, फ्रान्सच्या वार्या किंवा एखादा पुरस्कार...
हो ... संस्थाचालकाना एखादा पुरस्कार मिळवुन देण्यासाठी मी प्रयत्न करावेत असं आमच्या संस्थेतील एका गृहस्थांनी मला सुचविलं होतं. मी तसे प्रयत्न पण माझ्या वर्तूळात केले होते. पण पाण्याची खोली किती असते हे माझ्या सर्कलमध्ये अनेकांना कळत असल्याने मला त्या प्रयत्नाना फारसे यश मिळाले नाही.
त्याशिवाय आणखी एक कारण होते. ज्या भावसारांना भटकरांनी अगोदर सर्वांच्या डोक्यावर बसविण्याचे आणि मग वाचविण्याचे प्रयत्न जिवापाड केले त्या भावसारांना मी त्यांच्या हाताखाली पीएचडी करावी अशी एक crazy म्हणता येईल अशी प्रबळ इच्छा होती. त्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. पण भावसारांच्या हाताखाली पीएचडी म्हणजे आत्महत्या हे मला अनेक हितचिंतकांनी सांगितलं होते. त्यामुळे भावसाराना मी प्रोजेक्ट्मध्ये लुड्बुड करू देणार नाही हे उघड होतं. ज्यांना सरकारी संस्थातुन आपले भविष्य घडवायचे आहे त्यांना हे सगळे छ्क्केपंजे ठाउक असायलाच हवेत.
या प्रोजेक्टचा मसुदा करण्यासाठी मी बर्नार्डच्या घरी राहीलो तेव्हा मी अनेक गोष्टी शिकलोच पण त्यात सर्वात महत्त्वाची म्हणजे माझे इंग्लिश चमत्कार वाटावा इतके सुधारले. एका फ्रेंच विद्वानाने घडवुन आणलेला तो शक्तीपातच होता...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा