माल्कम ग्लॅडवेलच्या ’ब्लिन्क’ नंतर गर्ड गायगरेन्झरचे ’गट फिलिंग्ज’ हे पुस्तक माझ्या वाचनात आले. ’गट फिलिंग्ज’ हे पुस्तक मला ’ब्लिन्क’पेक्षा जास्त आवडले. ’गट फिलिंग्ज’ मध्ये मॉरल बिहेव्हीअर या प्रकरणाच्या सुरुवातीला दुसर्या महायुद्धाच्यावेळचा एक प्रसंग सांगतो -
१३ जुलै १९४२ रोजी जर्मन राखीव पलटण १०१ चा तळ पोलंडमध्ये होता. त्या दिवशी भल्या पहाटे संपूर्ण पलटणीला एका खेड्याबाहेर नेण्यात आले. शस्त्रास्रानी सज्ज पण पुढे काय आहे याची कसलीही कल्पना नसलेले ५०० सैनिक ५३ वर्षीय विल्हेल्म ट्रॅप नावाच्या त्यांच्या आवडत्या कंमांडर भोवती गोळा झाले होते. अत्यंत अस्वस्थपणे कमांडर ट्रॅपने घोषणा केली की त्याच्यावर आणि त्याच्या पलटणीवर एक अत्यंत भयंकर आणि निर्दय जबाबदारी टाकण्यात आली आहे. त्या खेड्यातले १८०० ज्यू नाझीविरोधी गटांच्या कारवयांमध्ये गुंतले होते. पलटणीला आदेश असा मिळाला होता की त्या खेड्यातल्या पुरुषांना छळ छावण्यांमध्ये हलवायचे आणि उरलेल्यांना म्हणजे स्त्रिया, लहान मुले, वृद्ध इत्यादीना जागेवरच गोळ्या घालुन मारायचे.
आदेशाचे वाचन करताना विल्हेल्म ट्रॅपच्या डोळ्यातुन अश्रु ओघळायला लागले होते. त्याच्यावर अशी जबाबदारी यापूर्वी कधीही टाकण्यात आली नव्हती. आदेशाचे वाचन संपल्यावर ट्रॅपने आपल्या सैनिकाना एक पर्याय देऊन आश्चर्याचा धक्का दिला. त्याने सांगितले की ज्या ज्येष्ठ अधिकार्याना ही जबाबदारी घेणे जड जाईल असे वाटते त्यांनी खुलेपणाने बाजुला व्हावे.
ट्रॅपने काही क्षण वाट बघितली आणि सुमारे डझनभर अधिकार्यांनी ट्रॅपने दिलेला पर्याय स्वीकारला आणि उरलेल्यानी ’कर्तव्य’पालनाचा पर्याय स्वीकारला.
गायगरेन्झरने या आणि आणखी काही उदाहरणांची चर्चा करून असे प्रतिपादन केले आहे की सहसा बहुतांश लोकांची प्रवृत्ती ’मूळ पर्याया’ला चिकटून राहायची असते. परंपरेला आणि authorityला चिकटणारे लोक परंपरेने दिलेल्या पर्यांयांच्या पलिकडे सहसा जाऊ शकत नाहीत. ते का याचे इथे चपखल उत्तर मिळते.
आज हे आठवायचे कारण म्हणजे मदर्स डे... काहीवर्षांपूर्वी माझ्या शेवटच्या नोकरीमध्ये मॅनेजिंग डायरेक्टर मिटींगमध्ये जर सिगरेटी फुंकणार असेल तर मी मिटींगला येणार नाही असे ठणकाऊन सांगायची धमक (आणि इतर अनेक मांजरांच्या गळ्यात घंटा बांधायची हिम्मत) ज्या genes मुळे मला मिळाली, त्या माझ्या आईला आजच्या मदर्स डे निमित्त अभिवादन.