रविवार, १ जानेवारी, २०१७

एक समस्या



अलिकडे व्यक्तीस्वातंत्र्याचा मुद्दा हिरीरीने बर्‍याचवेळा नाट्य/चित्रपट इत्यादीतून मांडला जातो (राजवाडे ऍण्ड सन्स, काहे दिया परदेस सारखी मालिका काही उदा० म्हणून देता येतील. फार पुढे जाऊन बोलायचे झाले तर कोर्टाचे कौटुंबिक दाव्यांमधले निवाडे पण उदा० म्हणून देता येतील). थोडक्यात व्यक्ती आणि कुटुंबात संघर्ष उभा राहीला तर व्यक्तीला झुकते माप द्यायचा प्रघात वाढला आहे. पण हाच संघर्ष व्यक्ती आणि समाज (किंवा एखादा मोठा गट) यांच्यात उभा राहिला तर समाजाला झुकते माप दिले जाईल. सर्जनशील व्यक्ती (कलाकार) आणि समाज हे सहसा षड्डु ठोकून उभे असतात. आय आय टी, पवई येथील मूडइंडिगो मधल्या चित्राचा वाद (किंवा माझे अलिकडे एका ग्रुपमधून झालेले निष्कासन) हे याचे ताजे उदा० आहे.

थोडक्यात व्यक्ती आणि कुटुंब या वादात व्यक्ती महत्त्वाची आणि व्यक्ती आणि समाज या वादात समाज महत्त्वाचा... हे त्रांगडं काही सोडवता  येत नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: