झी टिव्ही वरील झांसी की रानी ही मालिका मी बर्यापैकी नियमितपणे पहातो. पुण्यात राहून शाळेच्या पुस्तकात किवा इतर माध्यमातून झाशीच्या राणीच्या कर्तृत्वाचा यथार्थ परिचय कधिच झाला नव्हता. शाळेच्या इतिहासाच्या पुस्तकात दोन-चार ओळीत तिला गुंडाळण्यात आले होते.
टिव्ही वर चालू असलेली मालिका इतिहासाचे reconstruction आहे, हे मला मान्य आहे. त्यामुळे काही ठिकाणी (प्रसंगात) विशेषत: संवादामध्ये ही मालिका दर्जा घसरून हिंदी सिनेमा प्रमाणे संवंग बनते. त्यामुळे तपशीलाचा अपवाद केला तर मालिकेत चित्रीत केलेल्या घटना या अस्सल असाव्यात ( म्हणजे कपोलकल्पित नसावेत). कारण तसं झाल नसतं तर इतिहास बदलला म्हणून टिकेची झोड उठवायला लोकांनी कमी केले नसते.
काल या मालिकेत एक महत्वाची घटना दाखवली गेली. ती म्हणजे नेल्सन नावाच्य ईस्ट इंडिया कंपनीच्या क्रूर अधिकार्याला झाशीच्या राणीने हत्तीच्या पायी दिले.
झाशीच्या राणीच्या कारकिर्दीतील ही घटना मला तिच्या लढयातील कळसाध्याय वाटली. कारण ब्रिटिशांच्या सत्तेला इतका मोठा झटका एका स्त्रीने दिला याचे कौतुक वाटते. अफझलखानाच्या वधानंतर आपल्या इतिहासात वध सांगितला जातो तो चाफेकरांनी केलेला रॅण्ड्चा. पण त्याच वेळेस महाराष्ट्रातील इतिहासकारानी झाशीच्या राणीच्या अतुल्य शौर्यावरून जो बोळा फिरवला आहे त्याचे दू:ख झाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा