मी दिनांक १९ एप्रिलला लिहिलेल्या खालिल पोस्ट मध्ये आजची अमावस्या मोठ्या जनसमुदायासाठी अत्यंत शुभ ठरेल असे भाकित वर्तवले होते. अमेरिकेने ओसामा बिन लादेन वर केलेल्या कारवाई नंतर माझे भाकित नि:संशय खरे ठरले आहे. नुकत्याच येऊन गेलेल्या आर्थिक मंदीच्या मोठ्या तडाख्याच्या भाकिता नंतर वर्तवलेले हे दूसरे मोठे भाकित खरे ठरले याचा मला आनंद वाटतो.
माझ्या या भाकितावर अनेकजण अचूकता नसल्याचा आरोप करतील, पण माझ्या दृष्टीने त्याला फारसे महत्त्व नाही. कारण ज्योतिषात "कोअर इश्यु" जास्त अचूक पणे वर्तवता येतात. "कोअर इश्यु" कशा स्वरूपात प्रकट होतील हे सांगता येत नाही ही मी अभ्यास केलेल्या ज्योतिष तंत्राची मर्यादा आहे मी प्रांजल पणे नमूद करतो.
आणखी एक सांगण्या सारखी महत्त्वाची म्हणजे "सर्व अमावस्या अशुभ नसतात" या माझ्या निरीक्षणाला या घटनेने पुष्टी मिळाली आहे असो.
1 टिप्पणी:
आपली भाकिते मेदिनीय ज्योतिषाशी संबंधित वाटतात.
टिप्पणी पोस्ट करा