दिनांक ३१ जुलै २०११ रोजी सायन सिंह राशीत ७ अंश १९ मि.वर होणारी अमावस्या गोचर हर्षल बरोबर नवपंचम योग करते. याशिवाय गोचर प्लुटो बरोबर quincunx () नावाचा एकच त्रासदायक योग करते, आदल्या दिवशी दिनांक ३० जुलै २०११ रोजी चंद्र-शुक्र युती होत असून ही युती हर्षल बरोबर नवपंचम योग करत असल्याने, ही अमावस्या बर्याच प्रमाणात शुभ ठरण्याची शक्यता आहे. जन्म पत्रिकेत रवि, चंद्र, लग्न, ख-मध्य व शुक्र हे जर सुस्थितीत असतील तर अमावस्ये दरम्यान केलेले मोठे आर्थिक व्यवहार फायदेशीर ठरतील किंवा पूर्वी केलेल्या व्यवहारांचे लाभ पदरात पडतील.
पुढे दिलेल्या कोणत्याही सनातील जन्मदिनांकाना ही अमावस्या विशेष शुभ ठरेल -
२५ मार्च ते ३० मार्च
२७ जुलै ते २ ऑगस्ट
२७ नोव्हेंबर ते २ डिसेम्बर
अमावस्येच्या आदल्याच दिवशी सायन सिंह रास २ अंश १२ मि वर चंद्र शुक्र युती होत असून सायन सिंह रास ० अंश ते ९, सायन मेष रास ० ते ९ अंश, सायन धनु रास ० ते ९ अंश हे क्षेत्र अत्यंत शुभ झाले आहे. या क्षेत्रात ज्यांच्या जन्म पत्रिकेतील चंद्र, लग्न, ख-मध्य आणि बुध, शुक्र, गुरु हे ग्रह असतील तर त्याना ही अमावस्या शुभ जाईल.
चंद्र-शुक्र युती आणि अमावस्या यांच्यामुळे प्रभावित क्षेत्र बरेच मोठे असल्याने नेहमीचे जन्मतारखांचे गणित देता येत नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा