माझ्या ब्लॉगच्या वाचकांना त्यांच्या आयुष्यातील समस्यांविषयी ज्योतिषशास्त्रीय मार्गदर्शन हवे असल्यास मी मोफत मार्गदर्शन काही कालावधी साठी करून द्यायचे ठरवले आहे. येत्या शनिवारपर्यंत म्हणजे दिनांक ९ जून २०१२ पर्यंत जे वाचक माझ्याशी संपर्क साधतील त्यांनाच ही सेवा उपलब्ध राहील. दिनांक ९ जून २०१२ नंतर संपर्क साधल्यास मोफत सल्ला मिळणार नाही.
- २० ते ७० या वयोगटातील व्यक्तीकरताच ही योजना उपलब्ध आहे.
- आपल्या इमेल मध्ये खालिल माहिती व्यवस्थित दिलेली असावी
१.जन्मदिनांक -
२.जन्मस्थळ -
३.जन्मवेळ -
४.सध्याचे वास्तव्याचे ठिकाण
५.आतापर्यंतच्या आयुष्यातील चांगले आणि वाईट मोठे प्रसंग
६.आपला प्रश्न किंवा समस्येचे स्वरूप
अपुरी माहिती कळविल्यास आपल्या समस्येचा विचार केला जाणार नाही. आपली समस्या/प्रश्न मी अभ्यास केलेल्या तंत्राच्या कक्षेत येत असेल तरच मी आपल्या विनंतीचा विचार करीन.
कोणताही तोडगा सुचविला जाणार नाही.
मोफत सल्ला मिळत आहे म्हणून कुणी मूर्खासारखे प्रश्न विचारल्यास त्यांचा विचार केला जाणार नाही. मार्गदर्शन फक्त इंग्रजीतूनच मिळेल (इंग्रजी समजण्यात अडचण असेल तर संपर्क साधू नये).मला उत्तर देण्यासाठी लागणारा वेळ हा मला मिळालेल्या प्रतिसादानुसार कमी-जास्त असेल.
मोफत मार्गदर्शनाची संधी मी उपलब्ध करुन देत असल्याने माझा निर्णय अंतिम असेल. संपर्कासाठी माझा पत्ता - upadhye [dot] rajeev [AT] gmail.com
1 टिप्पणी:
lekhachi typical puNeri bhasha awadli :-)
Aditya
टिप्पणी पोस्ट करा