एक विसंगती?
धार्मिक भावना भडकतात तेव्हा भडकवणारा दोषी असतो.
मात्र लैंगिक भावना भडकतात तेव्हा भडकणारे दोषी असतात...
एक शंका
निसर्गाने निर्माण केलेल्या स्त्री-पुरुषांच्या लैंगिक रचनेत काही मुदलातच दोष आहे का? म्हणजे बघा अवयव तेच फक्त शुक्राणुंच्या ऐवजी पुरुषाच्या शरीरात बीजांड निर्मिती झाली असती आणि तर पुरुषाचे उद्दीपन मासिकधर्मा पुरतेच मर्यादित राहिले असते. स्त्रीयांच्या शरीरात अवयव तेच पण फक्त तेथे शुक्राणुंची निर्मिती होऊन फक्त समागमाच्या वेळी त्यांचा उत्सर्ग झाला असता तर आज मोठ्या प्रमाणात दिसणारा लैगिक (गैर)व्यवहार आपोआप नियंत्रित राहिला असता.
निसर्गा तू चूकलास रे बाबा! तुला वठणीवर कसे आणायचे?
३ टिप्पण्या:
भावना कुठल्याही असोत त्या चॅनेलाईझ करायला शिकणे हेच ध्येय असायला हवे.. नैसर्गिकतेनुसार त्या त्या उगवणारच, त्या इतरांना "उपद्रव" न देता सांभाळतो कसे हेच तर खरे शिक्षण...
अवयव तेच पण बायकांना दाढीमिश्या आणि पुरुषांना गुळगुळीत गाल असते तर निदान थोबाडत मारणे सोपे झाले असते हेही तितकेच सत्य आहे...
स्मश्रू
पुरुषांच्या दाढीमिशा थोबाडीत खाण्य़ापासून संरक्षण होण्यासाठी हे माहित नव्हते. आता कळले हे बरे झाले.
टिप्पणी पोस्ट करा