येत्या १० ऑगस्ट रोजी सायन सिंह-कुंभ राशीत १८ अंशावर पौर्णिमा होत असुन ही पौर्णिमा गोचर शनीशी केंद्र योग करते. त्याच बरोबर शनिबरोबर मंगळाची युती चालु होते. अंशात्मक शनि-मंगळ युती दि २६ ऑगस्ट रोजी होते. एकंदर आगामी कालावधी बर्याचजणाना त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे.
सायन वृश्चिक, कुंभ, वृषभ, सिंह रास १२ अंश ते २२ अंश, हे क्षेत्र या ग्रहयोगांनी प्रभावित केले असल्यामुळे या अंशात कुणाचे जन्मरवि, जन्मचंद्र, लग्न किंवा ख-मध्य असतील तर आगामी काळ अडथळे, अपघात, आजारपण इत्यादीनी त्रस्त करायची शक्यता आहे.
वरील क्षेत्रात इतर अन्य ग्रह असल्यासही आगामी काळ काहीना काही प्रमाणात त्रासदाय्क ठरायची शक्यता आहे.
वरील ग्रहयोगांशिवाय येत्या १८ ऑगस्ट रोजी होणारी गुरु-शुक्र युती सायन सिंह राशीत ७ अंश १४ मि. वर होत असुन एक अत्यंत शुभ योग आहे. या युतीने सायन सिंह, तूळ, धनु, कुंभ, मेष, मिथुन
या राशीत जन्मरवि, जन्मचंद्र, जन्मलग्न किंवा जन्मख-मध्य असतील तर आगामी काळात काही ना काही शुभ घटना घडुन प्रगतीचे पाऊल पुढे पडायची शक्यता संभवते.
बराच मोठा जनसमुदाय या योगांमध्ये येत असल्याने जन्मतारखांचे गणित देऊ शकत नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा