गुरुवार, ५ जुलै, २०१२

भाकीताचा पडताळा: माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणदिनांक ६ डिसेंबर २००८ च्या नोंदीमध्ये मी तत्कालीन नवे मुख्यमंत्री श्री अशोक चव्हाण यांच्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या जन्मतारखेवरून काही भाकीत केले होते. ते असे होते - "रवि-नेपचूनची युति श्री चव्हाण यांच्या पत्रिकेत असून ती त्यांना हतबल बनवेल. २०१२-१३ सालचे शनीचे या युतीवरील भ्रमण त्यांच्या राजकीय घोडदौडीला खो घालायची शक्यता आहे." याशिवाय असेही मी म्हटले होते की "२६ जानेवारीचे सूर्यग्रहण श्री चव्हाण यांच्या रवि-नेपचून युतीला कार्यरत करते. सूर्यग्रहणाचे परिणाम दीर्घकालीन असतात. तेव्हा श्री चव्हाण यांच्या कडून फार
अपेक्षा ठेवाव्यात असे मला वाटत नाही..." (पहा - http://rajeev-upadhye.blogspot.in/2008/12/blog-post.html)

आज वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार सीबीआयने श्री चव्हाण यांच्यावर आरोपपत्र ठेवले आहे.

मी माझे भाकीत फक्त जन्मतारखेवरून वर्तवले होते. श्री चव्हाण यांची जन्मवेळ व जन्मस्थळ मला उपलब्ध न झाल्याने भाकीतात अचूकता आणण्यास मर्यादा निर्माण झाल्या होत्या. तरीपण उपलब्ध माहीतीवरून वर्तवलेले भविष्य खरे ठरले आहे हे कुणीही नाकारू शकणार नाही.

1 टिप्पणी:

अमोल केळकर म्हणाले...

अभिनंदन ( आपले हां !)

( गैरसमज नको )