जननेंद्रिये
======
राजीव उपाध्ये (जून २०२३)
जननेंद्रियांविषयी लज्जा, तिरस्कार किंवा घृणा जगभर सापडते. हे एक acquired behavior आहे. मनुष्यप्राणी सभोवतालच्या निरीक्षणातून किंवा अनुभवातून योग्य काय आणि अयोग्य काय हे शिकत जातो. हे योग्य/अयोग्य त्या त्या समूहापुरतेच मर्यादित असते, याचे भान सहसा सर्वसामान्य व्यक्तीला नसते. जो समूह ताकदवान असतो, तो आपल्या योग्य/अयोग्यतेच्या कल्पना इतरांवर लादतो. भारतीय संस्कृती याला अपवाद नाही. पण भारतीय संस्कृतीमध्ये जननेंद्रियांची पूजा पण होते. हा परस्पर विरोध गमतीदार आहे.
पण जगभर मात्र एक मोठा वर्ग जननेंद्रियांविषयी नकारात्मक भावनातून मुक्त झालेला दिसतो. तसेच नग्नतेविषयी उदार दृष्टीकोन बाळगतो. मानवी जननेंद्रिये मोठ्या प्रमाणात कलाविष्काराचा (१,२, ३) विषय बनलेली दिसतात. teatro oficina या एका प्रसिद्ध नाटक कंपनीच्या एका नाटकात एक पात्र स्टेजवर हस्तमैथून करते. तर दूस-या एका नाटक कंपनीच्या एका ऑपेरात १२० पूर्णनग्न पात्रे गायन करतात! मला या कलाकारांच्या धाडसाचे कौतूक वाटते.
याच बरोबर जननेंद्रियांच्या आकारातील खाद्यपदार्थांची रेलचेल अनेक देशांत दिसून येते. पुरुष जननेंद्रियांच्या आकारातील बेकरीपदार्थ, आईस्क्रीम किंवा मिठाया इ० जपानपासून फ्रान्सपर्यंत अनेक युरोपीअन देशात दिसून येतात.
काल "मास्टरशेफ" या जगप्रसिद्ध पाकस्पर्धेत बैलांच्या जननेंद्रियांपासून (Bull's penis Pho) बनवलेला पदार्थ pressure test साठी निवडलेल्या स्पर्धकांना करायला सांगितला होता. हा पदार्थ चीन, व्हिएतनाममध्ये (४) एक delicacy म्हणून बनवला जातो. स्पर्धकांमध्ये असलेल्या एका मराठी महिलेने कोणताही थयथयाट न करता हा पदार्थ बनविण्याचे आह्वान स्वीकारले. या पार्श्वभूमीवर आपल्याकडे उर्फी जावेदच्या फॅशनमुळे उडवली गेलेली धूळ आठवली आणि हसू आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा