शनिवार, १३ ऑगस्ट, २०११

निर्बुद्ध ज्योतिषनिंदक

मी माझे ज्योतिष विषयक लेखन माझ्या ब्लॉगबरोबरच मिसळपाव या समूहस्थळावर प्रसिद्ध करतो. या समूहस्थळावर अनेक ठिकाणी भेटतात तशी ज्योतिषाची निंदा करणारी मंडळी भेटतात. पण त्याची आता मला सवय झाली आहे. या लोकांपैकी काही जण मला वारंवार यंव आह्वान स्वीकारा आणि त्यंव आह्वान स्वीकारा असे सतत ऐकवत असतात. विज्ञानाची अंधपणे कास धरणे किती निर्बुद्धपणाचे ठरू शकते, याचा मला नुकताच प्रत्यय आला. ज्या विज्ञाननिष्ठानी हा अनुभव मला दिला त्यांचे मी मन:पूर्वक आभार मानतो.

मी मिसळपाववर नूकतेच एक निवेदन केले होते. ते जसेच्या तसे पुढे देत आहे -
"एक निवेदन

मला मिसळपाव वर वारंवार आह्वाने देण्यात येतात आणि मी ती स्वीकारत नाही अशी पण तक्रार सारखी ऐकायला मिळते. म्हणून मी आह्वाने स्वीकारायचे ठरवले आहे. परंतु ते काही सुटसुटीत अटींच्या चौकटीत बसत असेल तरच...

- आह्वानकर्त्याना बर्‍याच वेळेस आपण दिलेले देत असलेले आह्वान "योग्य" आहे की हे कळायची पण अक्कल नसते असे लक्षात आले आहे. तेव्हा अशी आह्वाने एका स्वतंत्र समितीकडून तपासण्यात यावीत. या समितीत ज्योतिषी आणि ज्योतिषनिंदक यांचा समसमान सहभाग असावा. ही समिती आह्वानांची योग्यता ठरविण्यासाठी काही कसोट्या निश्चित करेल. अशा समितीने आहवान योग्य असल्याचे प्रशस्तीपत्रक दिल्यावरच ते आह्वान मी माझ्या अभ्यासाच्या कक्षेत येत असेल तर ते मी स्वीकारेन

- मी आह्वान स्वीकारल्यावर मला प्रत्येक जन्मतारखेसाठी रू, ५००/ (रु पाचशे) एवढे आह्वानशुल्क माझ्या बॅंकेत जमा करावेत. हे शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही.या शुल्कावर योग्य तो कर भरायची माझी तयारी आहे. समितीच्या सदस्यांच्या मानधनाची व्यवस्था आह्वानकर्त्याने करावी.

- दिलेल्या आह्वानातिल विदा संगणकावर जमा करण्याची व्यवस्था आह्वानकर्त्याने करायची आहे

- आह्वानांतर्गत विश्लेषणासाठी लागणारी सर्व गणनसाधने आह्वानकर्त्याने उपलब्ध करून द्यायची आहेत.

- समितीचे सर्व कामकाज उघड असावे. त्यांची इंटरनेटवरील एखाद्या ब्लॉगवर यथाकाल नोंद व्हावी, जेणे करून कोणती आह्वाने योग्य आहेत कोणती स्वीकारली गेली आहेत ते जनतेला समजेल.

या माझ्या मूलभूत अटी आहेत. गरज पडल्यास यांना पुरवणी-अटी जोड्ण्यात येतील."

------निवेदन समाप्त-------

यातल्या "आह्वानशुल्क" घेण्याबाबत माझी भूमिका अशी होती की कुणी शेंबड्या पोराने आह्वान देण्याचा उद्योग करू नये. दिलेले आह्वान पूर्ण गांभिर्याने दिलेले असावे. पण काही जणाना त्यात माझा पैसे कमवायचे असल्याचा स्वार्थ दिसला. "आह्वानशुल्क" घेण्याबाबत माझी दूसरी भूमिका अशी होती की , आह्वानातील जन्मतारखांची संख्या जर खूप असली ( खर्‍या आह्वानात ती असायला हवी) तर माझे डोकेफोड करण्याचे जे कष्ट होणार ते आह्वानातील जन्मतारखांच्या संख्येच्या प्रमाणात वाढणार. आणि मला त्याचा योग्य मोबदला हवाच. असो.

मिसळपावच्या काही सदस्यांनी मला आह्वान द्यायचे जोरदार प्रयत्न सुरु केले. पण ते हास्यास्पद होते कारण, जेमतेम २०-२५ पत्रिका गोळा होत होत्या. मला अपेक्षित असलेली तटस्थ समिती पण गठीत होईल असे दिसत नव्हते. अशा आह्वानांमधिल पोकळपणा उघड करण्यासाठी याच योग्य वेळेची मी वाट बघत होतो.

अशा आह्वानतून कोणताही ठोस निष्कर्ष काढता येत नाही किंवा निघत नाही, हे लोकांच्या पुढे आणायचे होते. एक ज्योतिषी जिंकला किंवा हरला हे ज्योतिष(शास्त्रा/विद्ये) बद्दल कोणतीही विधाने करण्यास करण्यास पुरेसे नाही. विज्ञानाची कास धरणार्‍यांना विज्ञानाच्या चौकटीत बसणारे आह्वान तयार करता येत नाही हे यातून अधोरेखित झाले. मी पेनल्टीच्या दडपणा खाली काम करावे अशी अपेक्षा करण्या पर्यंत काही जणांची मजल गेली होती. चाचणी देणार्‍याने दडपणाखाली रहावे हे कोणत्या वैज्ञानिकतेला धरून आहे. आह्वाने देणारे ज्योतिषाच्या मर्यादांमध्ये त्यांचे आह्वान तयार करत नाहीत, हे कशाच द्योतक? प्रत्येक ज्योतिषी जे दावे करतात त्या दाव्याच्या अनुरोधानेच आह्वान देण्यात यायला हवं. हे दावे प्रत्येक ज्योतिषी जे तंत्र वापरतो त्या तंत्रानुसार बदलु शकतात. हाडाची ऑपरेशन्स करणार्‍या डॉक्टरला आपण हृदयाची शस्त्रक्रिया करायचा चॅलेंज कधी देतो का?

नारळीकर आणि त्यांच्या कंपूने केलेल्या प्रयोगाबाबत असेच म्हणता येईल.

ज्योतिषाचा उपयोग सर्वानाच होतो असं नाही. त्यामुळे ज्या व्यक्तीना ज्योतिष उपयुकत वाटते त्यांच्याच बाबतीत ज्योतिषांचे दावे तपासायला हवेत. जे ज्योतिषी मतिमंदत्वाबद्द्ल दावे करतात त्यांच्या पुरतीच ज्योतिषाची चाचणी मर्यादित राहणार. आलेले निष्कर्ष त्या दाव्यां पुरतेच मर्यादित राहणार. अशा ज्योतिष-सेन्सेटिव्ह लोकांच्या बाबतीत पत्रिकेच्या आधारे आणि पत्रिकेचा आधार न घेता भाकिते करण्यात यावित आणि येणारे निकाल तपासायला हवेत. आणि समजा अशी सर्वंकष चाचणी घेतली तरी त्यातून जो निष्कर्ष निघेल तो तपासल्या गेलेल्या प्रमेया/गृहितका पुरताच मर्यादित राहील. म्हणजे बहुसंख्य ज्योतिषी मतिमंद्त्वाबद्दल भाकित करण्यात जर फसले, तर एव्ह्ढेच म्हणता येइल की मतिमंदत्वाचे निदान पत्रिकेच्या आधारे करता येणार नाही.

या संदर्भात मिसळपाव वरच एक सदस्य विंग कंमांडर शशीकांत ओक यांनी आह्वानकर्त्यांना दिलेली प्रतिक्रिया (http://misalpav.com/node/18763#comment-329984) अतिशय बोलकी आहे. ते म्हणतात, "समजा, जर आव्हान प्रक्रियेत फक्त ३ कुंडल्या हाताळल्या गेल्या त्यातील कथने बंद पाकिटातून मिळालेल्या माहितीशी शत प्रतिशत अचुक जुळली तर तो डेटा किरकोळ होता आणखी मोठ्या संख्येत कसोटी घ्यावी लागेल, असे म्हणत म्हणत लाखोंच्या संख्येने बंद लिफाफे उघडून त्यातूनही अचुक माहिती उघडकीस आली तरी आणखी मोठा डाटा घेतल्याशिवाय खरी कसोटी होऊ शकत नाही असे म्हटले जाईल व शास्त्राची मान्यता देण्यास नकार दिला जाईल. या विपरीत जर पहित्या प्रथम फेरीतील किरकोळ संख्येच्या लिफाफ्यातील माहितीशी अचुकता साधली गेली नाही तर ज्योतिषाला काडीचा आधार नाही असे सिद्ध झालेले आहे असा निवाडा तात्काळ होईल. बरोबर ना...."

ज्याना ही संपूर्ण चर्चा वाचायची असेले त्यांच्यासाठी पुढे दूवे देत आहे
१. http://misalpav.com/node/18750
२. http://misalpav.com/node/18763
३. http://misalpav.com/node/18775

असो... आता आह्वान चाचणी इ विषय तूर्त मी माझ्यापूरते बाजूला ठेवले आहेत

जाता जाता: पुण्यात काल एका तरूणीने भरधाव गाडी चालवून एका तरूणाला चिरडले. पुण्यात अपघात रोज होत असले तरी असे (भरधाव (मंगळ-हर्षल) वाहनाखाली चिरड्ण्याचे) अपघात रोज होत नाहीत. म्हणून हा अपघात पौर्णिमेच्या अमलाखालीच येतो.

८ टिप्पण्या:

धोंडोपंत म्हणाले...

श्री. उपाध्ये,

नमस्कार,

आपला वेळ सत्कारणी लावा. Unproductive गोष्टींमध्ये गुंतून वेळ फुकट घालवू नका. कसली आव्हानं आणि कसली प्रतिआव्हानं? लोकांना प्रचिती आलेय, येतेय म्हणून हजारो वर्षे हे शास्त्र टिकलं.

"राहु हा ग्रह नाही मग तो तुम्ही कसा काय पत्रिकेत घेता?" असा एक युक्तिवाद नेहमी हे लोक करतात.

ज्याला राहू महादशा येऊन गेलेय ना, त्याला विचारा राहू आहे की नाही? तो सांगतो कशी हालत झाली त्या दशेत ते.

काठावर बसून पाण्याची खोली नाही येत मोजता. हे या लोकांना कळत नाही.

द्या सोडून त्यांना. त्यांना आपलं म्हणा आणि भूतदयेने त्यांच्याकडे पहा.

आपला,
(अनुकंपाग्रस्त) धोंडोपंत

अनामित म्हणाले...

धोंडोपंत,

तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. पाण्याची खोली बघायला दोन्ही पाय पाण्यात घालायचे नसतात, हे पण बर्‍याच जणाना कळत नाही.


राजीव उपाध्ये

अनामित म्हणाले...

धोंडोपंत,

तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. पाण्याची खोली बघायला दोन्ही पाय पाण्यात घालायचे नसतात, हे पण बर्‍याच जणाना कळत नाही.


राजीव उपाध्ये

अनामित म्हणाले...

धोंडोपंत,

तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. पाण्याची खोली बघायला दोन्ही पाय पाण्यात घालायचे नसतात, हे पण बर्‍याच जणाना कळत नाही.


राजीव उपाध्ये

अमोल केळकर म्हणाले...

पंतांशी सहमत. आपण आपले काम करत रहायचे, ज्यांना वाटते ते संपर्क करतील नाहीत ते सोडून देतील

असो

अमोल केळकर

वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र मार्गदर्शन शिकवणी वर्ग म्हणाले...

"It is a great thing to understandin the profoound State,ent that Astrology is "God's Law"

Raju Concentration is the essence of all Knowledge; Ninety per cent of thought force is wasted by the ordinary human being, and therefore he is constantly committing blunders; the trained man of mind never makes a mistke.

We want that education by which character is formed, strength of mind is increased, the intellect is expanded and by which one can stand on one's own feet

Wrok hard to acquire knowledge, skills and wisdom we all of with you Be strong physically, mentally, intellectually, morally, and spiritually

sanjeev
vastuclass.blogspot.com

अनामित म्हणाले...

ज्याना आपला वैज्ञानिक दृष्टिकोन सिद्ध करण्यासाठी ज्योतिषशास्त्र बनावट आहे या गृहीताचा आधार घ्यावा लागतो त्यांची समजूत पटविण्याचा प्रयत्न करणे दुष्टपणाचे आहे. त्यांचा जीवनाधार काढून घेतल्यावर त्यानी जगावे कसे?

अनामित म्हणाले...

माझे मत पहिल्यापासून आहे तेच! ज्योतिष्यशास्त्र हे Statistics वर अवलंबून आहे व आता तरी सगळी variables माहीत झालेली नाहींत आणि जेंव्हां होतील तेंव्हां त्यांना जोडणारे software आणि सुपरसंगणकही लागेल. मी बर्‍याचदा म्हटल्याप्रमाणे हे "शास्त्र" २१०० किंवा २२०० साली शास्त्र म्हणवून घ्यायला सक्षम ठरेल. तोवर अर्धे बरोबर आणि अर्धे चूक.
शिवाय ५०० रु. फी घ्यायला हरकत नाहीं पण भविष्य चुकले तर पेनल्टी द्यायचीही आपली तयारी हवी.
असो!
K B Kale