ऍड. विभा हांडे आज मोठ्या खुषीत होत्या. आज त्यांची चार मॅटर्स डिसाईड व्हायची होती. त्यामुळे या कोर्टातुन त्या कोर्टात त्यांच्या खेपा चालु होत्या. त्यात संजय आणि नमिताच्या केसमध्ये संजयची क्रॉस पण आज त्या चालु करणार होत्या. खरं तर क्रॉसच्या अगोदरच हे मॅटर सेटलमेंटला येईल अशी त्यांची अपेक्षा होती. पण या केसमध्ये त्यांची सगळी गणितं चुकली होती...
ऍड. हांडे हे शहरातलं वजनदार आणि थरकाप उडविणारे नाव. ऍड. हांडेंच्या ऑफीसची पायरी चढणारी स्त्री आपल्याला हवा तसा घटस्फोट मिळणार याबाबत निश्चिंत असायची. कायदे स्त्रियांच्या बाजुने असल्याने ऍड हांडेंचा फॅमिली मॅटर्समध्ये चांगला जम बसला होता. घटस्फोटांचे वर्षाचे टारगेट पूर्ण केले की कोर्टात पेढे वाटणार्या त्या एकमेव वकील...
नमिताच्या केसमध्ये प्रथम त्यांनी ४९८-अचे हुकूमी हत्यार वापरायचा प्रयत्न केला पण पोलिसांनी तो अयशस्वी ठरवला होता. प्रकरण पुरेसे गढुळ झाले की मग त्या स्त्रीला पोटगीसाठी कोर्टाचा रस्ता दाखवायचा आणि मग प्रकरण ड्रॅग करायचे. मग शेवटी जी पार्टी कंटाळते ती तडजोडीला तयार होते, हा बहुसंख्य वकीलांचा हातखंडा फॉर्म्युला...पण ऍड. हांडेंचे कसब मात्र सगळेजण वाखाणायचे.
संजय वि. नमिताच्या केसमध्ये केस उभी राहीली तेव्हा मात्र सगळे फासे उलटे पडत गेले होते. कोणत्या वकीलाची केस आहे यावरून न्यायाधीश बरेच अंदाज बांधतात. नमितासाठी प्रथम त्यांनी अंतरीम पोटगीचा अर्ज आणला तेव्हा संजयने अर्जाला उत्तर द्यायच्या अगोदरच वकीलाला न विचारता मुलासाठी कोर्टाकडे दहाहजार रुपयांचा चेक पाठवला. चेक आल्यामुळे नमिताचा अंतरीम पोटगीचा अर्ज कोर्टाला निकालात काढावा लागला. खरं तर ९९ टक्के केसेस मध्ये कोर्ट पोटगीचा अर्ज नाकारत नाही.एकदा पोटगी चालु झाली म्हणजे बाई पण खुष आणि केस लांबवणे पण सोपे. पण इथे उलटे घडले होते.
आता मात्र पंचाईत झाली होती. ऍड. विभा हांडेंपुढे आता केस पुढे चालवायची एव्हढाच पर्याय होता. संजय मुलाच्या प्रेमाने कोर्टात नमतं घेईल ही त्यांची अपेक्षा फोल ठरली होती. मुलाला कोर्टात भेटायचे नाही असे त्याने ठरवले होते. केस मेरीटवर लढायची हे संजयच्या वकीलाने निक्षुन सांगितले होते आणि बायका आणि त्यांचे वकील कोर्टात कशाकशाची सौदेबाजी करतात हे संजय दर तारखेला कोर्टात बघत होता.
अशाच एका तारखेला त्यांनी केस चालु करायचा प्रयत्न केला. नमिताला साक्षीदाराच्या पिंजर्यात त्यांनी उभे केले आणि जज्जसमोर बोलायला सुरुवात केली. जज्जने नमिताकडे एक कटाक्ष टाकला आणि पुढची तारीख दिली. त्यावर जजसाहेबांच्या पट्टेवाल्याने संजयच्या कानात सांगितले, "साहेब, काळजी करू नका. तुमचं काम होऊन जाईल".
सुरुवातीची खेळी फसली आणि अचानक जज्जची बदली झाली. फासे नमिताच्या बाजुने पडल्याचे चित्र निर्माण झाले. नवीन जज्ज म्हणजे नवा गडी नवा राज. अगोदरच्या जज्जची मतं बनली असली तर नव्या जज्जसमोर ती नव्याने निर्माण करता येतात.
जवळजवळ सहाएक महीन्यांनी नवीन जज्ज आल्यावर त्यांनी केस परत मांडायचा प्रयत्न केला...पण संजय नमत नव्हता. त्याने उपस्थित केलेल्या मुद्द्यांना कुणाकडे उत्तरे नव्हती. संजयची केस मेरीट्वर लढण्यासाठी केवळ तेव्हढ्यामुळे पात्र ठरली होती.
संजयने एकटेपण स्वीकारले. मन वेगवेगळ्या गोष्टीमध्ये रमवणे चालु होते. केसचा तणाव कमी करण्यासाठी त्याला कुणीतरी ध्यानाचा मार्ग सुचविला. समस्या मनाने अंतरावर ठेवायला ध्यान उपयोगी पडते असे त्याने कुठे तरी वाचले होते. ध्यानाचा आणखी एक फायदा असतो. instincts तीक्ष्ण होण्यासाठी, मनातील कचरा कमी करण्यासाठी ध्यान मदत करते.
दरम्यान नवीन जज्ज येऊनही केस ठप्प झाली. तीन महीने होऊनही काहीही हालचाल होत नव्हती. हांडेबाईना केस चालविण्यात रस नाही असे संजयच्या वकीलाने सांगितले. आपण घटस्फोटाचा अर्ज करायचा नाही, निर्णय नमिताने घ्यायचा हे पण वकीलाने संजयला पटवले होते.
इकडे संजयच्या आजुबाजुच्या चोंबड्या काळुंद्र्यांनी संजयच्या कामवाल्या बाईला गाठुन प्रश्न विचारून भंडावुन सोडले होते. कामवाली वैतागुन संजयला मग केसबद्दल विचारायची.
"साहेब, या काळुंद्रयांना तुमचा एव्हढा पुळका आहे तर डायरेक्ट तुमच्याकडे का चवकशी करत नाही हो तुमच्या केसची?" कामवालीने संजयला विचारले.
"अहो, त्यांनी आणलेली स्थळं मी नाकारली होती. त्यामुळे त्यांना मज्जा येणारच!" - संजयने त्यांना खरे कारण सांगितले.
एक दिवस असाच संजय ध्यानस्थ असताना त्याच्या मनात एक कल्पना चमकुन गेली. त्याने कामवालीला विश्वासात घ्यायचे ठरवले.
"अहो यमुनाबाई, आता आपण एक गंमत करु या! तुम्ही मला मदत केली तरच ते शक्य आहे. कारण या बायका माझ्याशी बोलत नाहीत"
"सांगा ना साहेब, तुमचे हाल बघवत नाहीत हो" यमुनाबाईनी मदतीचा हात पुढे केला.
"तुम्हाला आता या बायका परत भेटल्या तर त्यांना सांगा की संजयने दुसरे लग्न केले आहे आणि दुसर्या बायकोला सहा महीन्यातच तो घेऊन येणार आहे"
"काय साहेब, काही पण काय बोलता राव?" - यमुनाबाईंना धक्का लपवता आला नाही.
"माझं ऐका. हे काम तुम्ही केलंत तर मी तुम्हाला पाचशे रु बक्षिस देईन" असं बोलुन संजयने पाचशेची नोट पुढे केली.
ते पैसे नाकारत यमुनाबाई म्हणाल्या, "बघा हं! तुम्हाला कल्पना आहे याचे काय परिणाम होतील याची? तुम्ही वकीलाशी बोलला आहात का?"
"मला पूर्ण कल्पना आहे आणि मी परिणामांची जबाबदारी घ्यायची ठरविली आहे. प्रत्येक गोष्ट वकीलाला विचारुन करत बसलो तर माझं आयुष्य या केस मध्ये सडेल."
एकदोन आठवड्यांनी सोसायटीतल्या काळुंद्र्यानी परत यमुनाबाईना गाठले आणि केसची चवकशी केली तेव्हा धीर गोळा करून यमुनाबाईंनी संजय ने नेमून दिलेले काम पार पडले.
संजयचा हा नेम बरोब्बर बसला... संजयच्या "दूसर्या लग्ना"ची बातमी वार्यासारखी पसरली आणि जिथे पोचायला हवी तिथे पोचली. आता मात्र केस पुढे चालविण्याशिवाय हांडेबाईना पर्याय नव्हता...
क्रमश:..